Pushpa 2 Collection : पुष्पा भाऊचा जगात बोलबाला; पार केला 1200 कोटींचा टप्पा
Saam TV January 07, 2025 04:45 PM

5 डिसेंबरला 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. हा एक ॲक्शन चित्रपट आहे. 2021मध्ये रिलीज झालेला 'पुष्पा द राइज' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिकासोबतच (Rashmika Mandanna) दोन्ही भागांमध्ये प्रेक्षकांना फहद फॉसिलची भूमिका खूप आवडली.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 33

'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉस्क ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये कमावले. अकराव्या दिवशी 76.6 कोटींची कमाई केली. तर एकविसाव्या दिवशी 19.75 कोटी रुपये आणि एकतिसाव्या दिवशी 5.5 कोटींची कमाई केली.

चित्रपटाने तेहत्तीसाव्या दिवशी 2.5 कोटी कमावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत ''चित्रपटाने 1206 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनआणि मंदानाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

'पुष्पा 2' चित्रपट गेल्या 30 वर्षांत तिसरा सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपट आहे. दुसऱ्या नंबरवर 1994 मध्ये रिलीज झालेला सलमान खानच्या 'हम आपके है कौन है' हा आहे. तर पहिल्या स्थानावर 'बाहुबली 2' आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1831 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या एक महिन्यानंतरही 'पुष्पा 2' थिएटर गाजवत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.