Latest Maharashtra News Updates : प्रतिमोर्चे काढले तर आम्हीं देखील तसंच उत्तर देवू - मनोज जरांगे
esakal January 06, 2025 02:45 AM
Nagpur Live : गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यू

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा H5N1 ( बर्ड फ्ल्यु) ने मृत्यू झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालाय

- H5N1 हा पक्षांमध्ये आढळणार विषाणू आहे. मात्र वाघ व बिबटयांना यांची लागण झाल्याने खळबळ उडली आहे.

- H5N1 मुळे वाघाच्या मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

- सध्या गोरेवाड रेस्क्यु सेंटर ला 12 वाघ व 24 बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना H5N1 लागण झाली नाही. मात्र संपूर्ण रेस्क्यू सेंटरचे रोज निर्जंतुकीकरण केले जात असून प्राण्यांमध्ये सोशल डीस्टंटसिंग पळाली जात आहे

Live : प्रतिमोर्चे काढले तर आम्हीं देखील तसंच उत्तर देवू - मनोज जरांगे

मनोज जरांगे हे वंजारी समाजाचा अपमान करत असून त्याच्या निषेध म्हणून आम्ही मोर्चा काढू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला होत्या त्याला आता मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जर ओबीसी नेत्यांनी मोर्चे काढले तर आम्ही प्रतिमोर्चे काढू असे ते म्हणाले.

OBC Live: ओबीसी नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा: प्रति मोर्चाची तयारी सुरू

ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांत भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. वंजारी समाजाला ज्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे, त्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट होणार आहे. दुसरीकडे, जरांगे पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाकडून प्रति मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महसूल मंत्री सुरेश धस यांच्या कार्यकाळातील निर्णयांवरही चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांना करण्यात आली आहे.

Laxman Hake live: लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका. जर तुमच्यात खरोखर दम असेल, तर कुठे घुसायचं ते सांगा," अशी चिथावणीखोर टिप्पणी करत हाके यांनी संताप व्यक्त केला. अशा वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तींच्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हाके यांनी केली आहे.

कोयना परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोयनानगर परिसरात आज सकाळी 6:56 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर 2.4 तीव्रतेचा हा धक्का नोंदवण्यात आला असून, भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किमी अंतरावर होता. गोषटवाडी गावाच्या नैऋत्येला सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या या केंद्रबिंदूची खोली 7 किलोमीटर इतकी असल्याचे समजते. या सौम्य धक्क्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली, तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra: आरोग्य मित्र करणार काम बंद आंदोलन

आरोग्य मित्रांना वेतन द्या अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशारा आरोग्य मित्र संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना यांच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आलाय. आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न दिल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Live: गोडाऊनच्या आगीत चित्रीकरणाची वाहने खाक

मालाड पश्चिमेतील धारवली डोंगरपाढा येथे गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत चित्रीकरणाची दोन वाहने जळून खाक झाली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करीत आग आटोक्यात आणली. सध्या या प्रकरणाचा तपास मालवणी पोलिस करीत आहेत.

Nagpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार

नागपूर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार

- राज्यातील वाहतूक सुविधा बळकटी करणात भर पडणार...महाराष्ट्र रेलकडून निर्माण केलेल्या राज्यभरातील सात उडाणपूलाच लोकार्पण होणार..

- रामदास पेठ परिसरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर होणार लोकार्पण सोहळा.

Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण कामाला मिळणार गती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण कामाला आता गती मिळणार

- वायुदलाकडील जमीन नवीन जागेवर स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले

- जिल्हाधिकारी तथा एमएडीसी चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. इटनकर यांनी भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.