मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Marathi January 07, 2025 05:24 PM

नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू (Asaram Bapu) संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 85 वर्षीय आसाराम बापूला सुटकेनंतर आपल्या अनुयायांना भेटू नये, असे निर्देश दिले आहेत. बापूंवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असून  तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

दरम्यान, आसाराम बापूवर (Asaram Bapu) यापूर्वी ही उपचारसाठी खोपोलीत दाखल केलं होतं. खोपोलीतील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापूला खोपोलीत (Asaram Bapu) दाखल करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) राजस्थान उच्च न्यायालयाने आता देखील दिलासा देत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे

31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला (Asaram Bapu) ह्रदयविकाराचा त्रास होत होता. दरम्यान वैद्यकीय कारणासाठी आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवून आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या आश्रमात एका महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल त्याला गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले होते.

बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

85 वर्षीय आसाराम बापू हा 2013 पासून जोधपूर तुरुंगात बंद आहे. आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती. आसारामने आपल्या आश्रमातच एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पाच वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याशिवाय दुसऱ्या एका प्रकरणातही आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आला आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील आश्रमातील एका महिलेने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.