चऱ्होली : चिखलीतील आकांक्षा सतीश डिसले हिने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आकांक्षाचे वडील मूळचे जामखेडमधील असून, उदरनिर्वाहासाठी ते पुण्यामध्ये आले.
त्यांनी काही वर्षे रिक्षाचालक म्हणून काम केले. कालांतराने त्यांनी हॉटेल व्यवसाय व इतर क्षेत्रांमध्ये पदार्पण केले.
आकांक्षाचे माध्यमिक शिक्षण अमृता विद्यालय येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण कॅम्प एज्युकेशन निगडी येथून पूर्ण केले. शिक्षण घेत असताना तिने सीए परीक्षाचा अभ्यास सुरू केला होता.