Criticism of Thackeray group regarding expenditure on bungalows of Union Ministers msj
Marathi January 06, 2025 05:24 PM


(Delhi Elections 2025) मुंबई : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा शासकीय बंगला आणि उधळपट्टी हा दिल्ली विधानसभेतील प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर अवाच्या सवा खर्च केले हा टीकेचा विषय ठरू शकतो, पण दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घरांवर गेल्या दहा वर्षांत कशी आणि किती उधळपट्टी झाली? मंत्र्यांनी त्यांची घरे कशी राजेशाही, मोगलाई पद्धतीने सजवली आहेत आणि त्यासाठी सरकारी पैसा कसा खर्ची पडला यावरही बोलायला हवे, असे सांगत ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे. (Criticism of Thackeray group regarding expenditure on bungalows of Union Ministers)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा तसेच लुटमारीचा आरोप करावा हे आश्चर्यकारक आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून काहीच केले नाही. दिल्लीच्या जनतेला सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरले, पण स्वतःसाठी सरकारी खजिना रिता करून एक ‘शीशमहल’ बांधला, त्याची किंमत 45 कोटी आहे. या ‘शीशमहल’च्या खर्चाचा लेखाजोखा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक प्रचार सभेत मांडत आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

– Advertisement –

हेही वाचा – SS UBT on Modi : झोलाछाप फकीर स्वतःच्या झोल्यातून…, ठाकरे गटाची घणाघाती टीका

केजरीवाल यांच्या बंगल्यात सोन्याचे कमोड आहे, असेही त्यांच्या विरोधकांनी प्रसिद्ध केले. राजकीय प्रचाराचा स्तर किती खाली घसरला आहे त्याचे हे उदाहरण आहे. केजरीवाल हे 50 हजार वर्ग फुटांच्या बंगल्यात राहतात, असे अमित शहा म्हणतात आणि ही उधळपट्टी आहे असा त्यांचा दावा आहे. यावर काय बोलायचे? अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

– Advertisement –

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारास ‘दोन गज’ जमीन न देणारे पंतप्रधान आणि त्यांचे सरकार स्वतःचे ‘महल’ उभारण्यासाठी सरकारी तिजोरी आणि जमिनीची लूट करीत आहेत, पण टीका मात्र केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्यावर करीत आहेत, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुनावले आहे.

देशात 80 कोटी गरीबांना फुकट धान्य द्यायचे व परदेशात जाऊन तेथील प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा पंतप्रधान मोदी यांचा शौक आहे. भारतात 2023-24 मध्ये 37 लाख मुलांनी शाळा, शिक्षण सोडले. ज्यात 16 लाख मुलींचा समावेश आहे. गरिबीमुळे त्यांच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली आणि पंतप्रधान मोदी दिल्ली विधानसभेत ‘शीशमहल’वर भाषण झोडीत आहेत. भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे. पण बोलायचे कोणी? बोलेंगे तो कटेंगे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

काँग्रेसवर टीका

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका हा भाजपा आणि ‘आप’साठी जीवन-मरणाचा खेळ बनला आहे. या खेळात काँगेस पक्षही स्वतःचे हुनर दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. आप अर्थात आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे एकाच वेळी भाजपा आणि काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि आपने एकत्र लढवली तसेच आता विधानसभेत त्या दोघांची फ्रीस्टाईल कुस्ती लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

महायुती रडारवर

राज्याराज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी आपले सरकारी बंगले मनाप्रमाणे सजवले आहेत. महाराष्ट्रात सगळाच मामला ‘अलग’ म्हणायला हवा. मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदे यांनी एका मुख्य बंगल्यासह एकूण तीन सरकारी बंगले ताब्यात ठेवले आणि आता मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यावरही ‘उप’ बनलेल्या शिंदे यांनी दोन बंगले ताब्यात ठेवले आहेत. फडणवीस हे ‘उप’ असताना ‘सागर’ बंगल्यासह आणखी एक मोठा सरकारी बंगला त्यांनी ठेवला होता. पूर्वीच्या सर्वच महान मुख्यमंत्र्यांचे एकाच बंगल्यात भागत होते. आताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दोन-तीन बंगले लागतात. ही उधळपट्टी त्या ‘शीशमहल’ प्रकरणापेक्षा मोठी आहे, अशी खरपूस टीका ठाकरे गटाने महायुतीवर केली आहे.

हेही वाचा – Free Meals in Shirdi : सुजयजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी…, सुषमा अंधारेंनी मांडला लेखाजोखा



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.