Love life: एखादी मुलगी तुमच्या प्रेमात आहे हे कसे ओळखाल?
Mensxp January 06, 2025 05:45 PM

तुम्ही अनेकदा लोकांकडून असे ऐकले असेल की, लहानपणी त्याचे त्याच्या शिक्षिकेवर क्रश होतं. त्याला त्याच्या आवडत्या शिक्षिकेला बघायला आणि त्यांच्याशी बोलायला खूप आवडायचं. तसेच काही लोकांना अभिनेते किंवा अभिनेत्रींचे सुद्धा वेड असते. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होताच ते पहिला शो पाहण्यासाठी चित्रपट गृहात पोहोचतात.

त्याचप्रमाणे मुलींचेही मुलांवर क्रश असते, पण मनात संकोच असल्याने त्यांना मनापासून, मोकळेपणाने बोलता येत नाही. कधीकधी मुले देखील कन्फ्यूज  होतात की खरोखर मुलीचे आपल्यावर क्रश आहे की नाही. पण, काळजी करू नका आणि काही गोष्टींकडे लक्ष द्या. येथे आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला तिच्या भावना कळतील.

खरे प्रेम मिळविण्यासाठी कोणत्याही युक्त्या नाही तर, समजून घ्या हे रिलेशनशिप रूल्स

जवळ राहण्यासाठी करेल बहाना (Wants to be little closer)

© Shutterstock

जर एखाद्या मुलीला एखाद्या मुलाबद्दल स्पेशल फिलिंग्ज असेल तर तिला प्रत्येक क्षणी त्याच्या जवळ राहावेसे वाटते. त्यामुळे ती तुम्हाला भेटण्याचा किंवा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी जेणेकरून ती तुमच्या जवळ कशी राहू शकेल यासाठी नेहमीच अशी संधी शोधते.

काही वेळा मुलींना त्यांच्या भावना बोलून दाखवता येत नाहीत. म्हणूनच मुलाने स्वतःच तिच्या भावना समजून घ्याव्या असे मुलींना वाटत असते. त्यामुळे जेव्हा ती तुमच्यासोबत असते तेव्हा ती अशी काही तरी अॅक्टिव्हिटी करते ती तुम्ही नोटीस केली पाहीजे.  

सोशल मीडियावर होतो इमोजीचा खेळ (Use more emojis)

जेव्हापासून सोशल मीडियाचे वेड लोकांना लागले आहे, तेव्हापासून विविध इमोजींच्या माध्यमातून आपण आपल्या मनातली गोष्ट इमोजीच्या साहाय्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. जर एखादी मुलगी तुमच्याशी मेसेजद्वारे बोलताना किंवा इतर सोशल हँडलवर चॅट करताना जास्त इमोजी वापरत असेल, तर समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी खास आहात.

बहुतेक लोक इमोजी फक्त खास मित्र किंवा खास लोकांसाठीच वापरतात. सामान्य लोकांशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी बोलताना तो आपला मुद्दा थेट बोलतो. ते सजवण्याकडे जास्त लक्ष देत नाही. त्याचठिकाणी एखादी मुलगी किंवा मलगा ज्याच्याशी विशेष भावना जुळलेल्या असतील तेथे ते विविध इमोजिंच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे  (Try to pull attention)

© Shutterstock

जर एखादी मुलगी तुम्हाला आवडत असेल तर ती नक्कीच तुमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल. विशेषत: जर तुम्ही एखाद्या पार्टीत व्यस्त असाल किंवा लोकांभोवती असाल तर तुमचे लक्ष वेधण्यासाठी ती अशी काही तरी एक्टीव्हिटी करेल जेणेकरून तुम्ही तिला पाहू शकाल, तिच्याकडे लक्ष द्याल.

बर्याच वेळा ती ओरडून आपला उत्साह व्यक्त करेल किंवा पार्टीमध्ये अचानक नाचू लागेल किंवा गाणे गायला लागेल.  यासोबतच ती तुम्हाला या एक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यास सांगेल. या गोष्टींवरून तुम्ही समजू शकता की तिला तुमच्याप्रति विशेष भावना आहेत.

नजरा-नजर (Focus on eye contact)

एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर ती त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलत असते. यातून आपुलकीची भावना निर्माण होते. यामुळे संवादही सुधारतो.

बॉलीवूड चित्रपटांतून प्रेम कसे व्यक्त होते हे तुम्ही पाहिले असेलच. असाच काहीसा अंदाज क्रशबद्दल मनात फिलिंग्ज असतानाही होते.

जर तुम्हाला असेही वाटत असेल की, एखादी मुलगी तुमच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, तर समजून घ्या की ती तुमच्याबद्दल विचार करते.

तुमच्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे (Pay Extra attention)

कधीकधी मित्र किंवा सहकारी  ग्रुपने बाहेर जातात किंवा पार्टी करतात. अशा वेळी बरेच लोक एकत्र राहतात आणि बोलतात ,चर्चा, गप्पा गोष्टी चाललेल्या असतात  परंतु अशावेळी जर एखाद्याचे तुमच्यावर क्रश असेल तर ते इतरांपेक्षा तुमच्यावर जास्त लक्ष केंद्रित करते.

मुलगी इतर मित्रांशी देखील बोलेल, परंतु तुमच्याकडे जास्त लक्ष देईल. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही ती  मनमोकळेपणाने हसेल. सोबतच तुम्हाला एंगेज ठेवण्यासाठी तुमच्या शब्दांना उत्तर देखील देईल.

एक्सट्रा केअर (Over protective and caring)

© Shutterstock

घरातील तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टींची आई खूप काळजी घेते हे तुम्ही पाहिले असेलच. कारण ती तुमची जास्त काळजी घेते. इथे क्रशच्या मनात दडलेल्या भावना जाणून घेण्याचा देखील असाच एक मार्ग आहे.

तुम्ही बघा, जर एखादी मुलगी तुमचे जास्त लाड करते, तुम्हाला जास्त पॅम्पर करते, तुमच्या खाण्यापिण्याची किंवा इतर गरजांची काळजी घेते, तर समजून घ्या की तिला तुमच्यासाठी काहीतरी खास वाटत आहे.

याशिवाय जर तुम्ही उदास असाल तर अशा वेळी तिचाही मूड बिघडतो. दुसरीकडे, जर तुम्ही आनंदी असाल तर तिला तुमच्यापेक्षाही आनंद होतो, ती फ्रश फिल करते. कारण तिला तुम्हाला नेहमी हसताना बघायचे असते.

सिक्रेट शेअर करण्याची असते इच्छा (Reveals the secrets)

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण फक्त आपल्या जवळच्या लोकांशीच शेअर करतो. त्याचप्रमाणे, जर एखादी मुलगी तिच्या वैयक्तिक गोष्टी तुमच्याशी शेअर करत असेल तर समजून घ्या, की ती तुम्हाला आपले समजते.

विशेषतः जर मुलीने तिच्या भूतकाळातील किंवा कौटुंबिक समस्यांबद्दल सांगितले किंवा तुमच्याकडून सूचना मागितल्या तर समजून घ्या की, त्या मुलीच्या तुमच्याप्रती काही खास भावना आहेत. 

बोलताना लाजणे (Feel shy while talking)

© Shutterstock

एखाद्या मुलीला एखाद्या मुलाप्रती खास आकर्षण असेल, विशेष भावना असतील तर त्याच्याशी बोलायला ती लाजते.  कारण सामान्यतः कोणत्याही व्यक्तीशी बोलण्यात आपल्याला संकोच वाटत नाही. म्हणूनच जर एखादी मुलगी तुमच्याशी बोलताना लाजत असेल, तरीही तिला तुमच्याशी जवळीक साधायची असेल, तर समजून घ्या की प्रकरण काही वेगळे आहे.

नाराज होणे हे देखील एक लक्षण आहे  (Become nervous)

अनेकवेळा जेव्हा आपल्या मनात एखाद्याबद्दल काही विशेष भावना असतात, तेव्हा आपण त्यांच्याशी नजरा नजर करत नाही त्याउलट त्याला चोरून चोरून पाहत असतो आणि अशा वेळी आपले क्रश अचानक आपल्या समोर आला तर अस्वस्थता जाणवू लागते.

जर एखादी मुलगी तुम्हाला आवडते आणि अगदी सामान्य वागते, परंतु तुमच्या तिथून जाण्यानंतर लगेच तिलाही तिथून बाजूला व्हावे वाटते, किंवा तुमच्या नजरेला नजर भिडण्यापासून तिला वाचायचे असेल तर समजून घ्या की तुम्ही तिचे क्रश आहात.

जाणून घ्या मुलींचे 5 सुपर सिक्रेट्स

दुरावा होतो असह्य (Don’t want to let you go)

तुम्हाला आवडतेल्या व्यक्तीला सदैव तुमच्या अवती - भोवती राहायचे असते, पण जेव्हा तो दूर जाऊ लागतो, तेव्हा ती अस्वस्थ होऊ लागते. त्यामुळे अनेकवेळा ती तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करते.

जर एखाद्या मुलीला तुमच्यासाठी खास वाटत असेल आणि ती तुमच्याशी बोलली तर ती तुम्हाला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने थांबवेल.

निष्कर्ष 

जर एखाद्या मुलीला एखाद्यासाठी विशेष वाटत असेल तर ती तुमच्याकडे अधिक लक्ष देईल. तसेच तुमची अतिरिक्त काळजी घेईल. त्याच वेळी, ती मुलाशी बोलताना ब्लश देखील करेल. अशा काही गोष्टींमुळे तुम्ही मुलीच्या मनातील तुमच्याबद्दलच्या भावना जाणून घेऊ शकाल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.