सौंदऱ्याची खाण, 40 कोटींचं घड्याळ अन् 19 कोटींची पर्स; मोदींसोबतच्या व्हायरल फोटोतील सुंदरी आहे कोण?
GH News January 06, 2025 06:13 PM

सोशल मीडियामुळे कोण कधी चर्चेत येईल काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर अशीच एक महिला सध्या चर्चेत आली आहे. जिचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. एवढच नाही तर, महिलेचा पंतप्रधान मोदींबरोबरचा फोटोही चर्चेत आला आहे. फोटो पाहून या महिलेचं सौंदर्य नेटकऱ्यांनाही भूरळ घालत आहे.

 सौंदर्यवती थायलंडच्या पंतप्रधान 

त्यामुळे तर ही महिला नक्की कोण आणि मोदींना भेटण्यामागचे कारण नक्की काय? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरणारी ही महिला थायलंडच्या पंतप्रधान आहेत. यांचं नाव आहे पायतोंगटार्न शिनावात्रा

पायतोंगटार्न यांच्या सौंदऱ्यांप्रमाणेच त्यांच्या संपत्तीची आणि तिच्याकडील आलिशान वस्तूंची चर्चा आहे तेवढीच चर्चा होताना दिसतेय. पायतोंगटार्न सध्या 37 वर्षाच्या आहेत.

राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी कमिशनकडे पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी आपल्या संपत्तीचं विवरण दाखल केलं आहे. 3 जानेवारी रोजी पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी त्यांच्याकडील एकूण संपत्तीबरोबरच त्या कोणत्या आलीशान गोष्टींच्या मालकीण आहेत हे ही सांगितलं आहे.

3400 कोटी रुपयांची संपत्ती 

मात्र पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी आपल्याकडे एकूण 13.8 बिलियन थाय भत म्हणजेच भारतीय चलनानुसार 3400 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याकडील महागड्या गोष्टींचीही तेवढीच चर्चा आहे. तिच्याकडे एकूण 75 दुर्मिळ, अतीदुर्मिळ आणि महागडी अशी घड्याळं आहेत. या घडळ्यांची किंमत 40 कोटी रुपये इतकी आहे.

कोटींच्या वस्तूंची चर्चा 

पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या नावावर जपानबरोबरच लंडनमध्येही संपत्ती असल्याचं म्हटलं जातं. तसेच थायलंडमध्येही अनेक ठिकाणी पायतोंगटार्न शिनावात्रा यांची संपत्ती आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याकडे 167 डिझायनर आउटफिट्स आहेत. या डिझाइन्सची किंमत 60 लाख रुपयांहून अधिक आहे.

पायतोंगटार्न शिनावात्रा या कारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे एकूण 23 कार आहेत. त्यांच्या कारच्या ताफ्यामध्ये ‘बेंटले फ्लाइंग स्पर हायब्रीड’ पासून ते ‘रोल्स रॉइस फँटम’ कारचाही समावेश आहे.

थायलंडमधील राजकीय कुटुंबात जन्म

फेउ थाई पक्षाच्या नेत्या असलेल्या पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी 16 ऑगस्ट 2024 पासून पक्षाची धुरा हाती घेतली आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडमधील राजकीय कुटुंबात जन्म झाला असल्याने राजकारणाचं बाळकडू लहानपणापासूनच देण्यात आलं होतं. पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडमधील सर्वात कमी वयात पंतप्रधान झालेल्या आणि केवळ दुसऱ्या महिला पंतप्रधान आहे.

क्कम स्वरुपात आपल्याकडे एकूण 2530 कोटी रुपये

थायलंडच्या पंतप्रधान असलेल्या पायतोंगटार्न शिनावात्रा यांना महागड्या हॅण्डबॅग्सचीही आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या हँडबॅग्जचा देखील संग्रह आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण 217 लग्झरी हँडबॅग आहेत. त्यांची किंमत 19 कोटी रुपये इतकी आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी गुंतवणूक आणि रोख रक्कम स्वरुपात आपल्याकडे एकूण 2530 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं आहे.

थायलंडच्या माजी पंतप्रधानांची कन्या

तसेच पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या बँक खात्यावर 248 कोटी रुपये असल्याचंही म्हटलं जातं आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याकडील संपत्ती ही 2212 कोटी 44 लाख 25 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आधी होती.

थायलंडचे माजी पंतप्रधान असलेले थाकसिन शिनावात्रा हे पायतोंगटार्न शिनावात्रा यांचे वडील आहे. तसेच थाकसिन शिनावात्रा यांचे देशातील टेलिकॉम उद्योग व्यवसायातील सर्वात मोठं नाव आहे.

व्हिएतनाममध्ये पूर्व आशिया परिषदेतील मोदींसोबत भेट

थाकसिन शिनावात्रा यांना तीन मुलं असून त्यापैकी पायतोंगटार्न शिनावात्रा या सर्वात धाकट्या आहेत. पायतोंगटार्न शिनावात्रा यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. भारतात पायतोंगटार्न शिनावात्रा यांचा पंतप्रधान मोदींबरोबरचा फोटो चर्चेत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, थायलंडच्या पंतप्रधान म्हणून पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी व्हिएतनाममध्ये पूर्व आशिया परिषदेला हजेरी लावलेली. त्यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तेव्हाचाच फोटो आता व्हायरल होतोय

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.