Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख हत्याप्रकरण, ४ आरोपींना केज पोलीस ठाण्यात आणले
Saam TV January 07, 2025 06:45 AM
Beed News: संतोष देशमुख हत्याप्रकरण, ४ आरोपींना केज पोलीस ठाण्यात आणले

संतोष देशमुख हत्याप्रकरण

4 आरोपींना केज पोलीस ठाण्यात आणले

काही वेळात केज न्यायालयात करणार हजर

Beed News: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा..

परभणी घटनेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्या घेऊन आंबेडकरवादी संघटनेने काढलाय बीडमध्ये मोर्चा..

मोर्चात हजारो नागरिक सहभागी

Pune News: मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंजारी समाज आक्रमक

मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंजारी समाज आक्रमक

शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाहेर वंजारी समाजाची कार्यकर्ते आक्रमक

वंजारी समाजाविरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांना मिळाला जामीन

प्रशांत किशोर यांना मिळाला जामीन

उपोषणादरम्यान पोलिसांनी केली होती अटक 

बीपीएससी उमेदवारांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते प्रशांत किशोर

सोमवारी सकाळी पाटणा पोलिसांनी केली होती अटक

Nagpur News: नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप, काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा

नागपूर - काँग्रेसचे बंटी शेळके यांनी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे...

मोर्चा कार्यालय परिसरात दाखल होईल,

तीव्र आंदोलन करून गोधळ होण्याची शक्यता

Pune News: पुण्यात नामांकित बिल्डरच्या विरोधात मूक आंदोलन

पुण्यात नामांकित बिल्डरच्या विरोधात मूक आंदोलन

बिल्डरने पाणी, वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप

मात्र परांजपे ग्रुपकडून आरोप फेटाळले आहे

Nashik News: नाशिकच्या तपोवन परिसरात जॉगिंग ट्रॅकलगत युवकाची आत्महत्या

- नाशिकच्या तपोवन परिसरात जॉगिंग ट्रॅकलगत युवकाची आत्महत्या

- युवकाने झाडाला दोरीच्या साह्याने लटकून केली आत्महत्या

- आडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

- युवक हा जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील असल्याचा अंदाज

- युवकाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू

Dharashiv News: धाराशिवमध्ये 2 गटात हाणामारी, 4 जणांचा मृत्यू

धाराशिव जिल्यात धक्कादायक घटना

एका समाजाच्या 2 गटात हाणामारी

4 जणांचा मृत्यू यामध्ये 3 पुरुष एक महिलेचा समावेश

वाशी तालुक्यातील बावी पिडी वरील घटना

शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याचो माहिती

मध्यरात्री रात्री घडली घटना येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल

10 आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात

Nashik News: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज नो व्हेईकल डे

- नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज नो व्हेईकल डे

- नवीन वर्षात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी करणार सार्वजनिक वाहनाचा वापर करणार

- नाशिकचे जिल्हाधिकारी जलाच्या शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे आज पायी चालत आपल्या कार्यालयात गेले

- नाशिक शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी अल्पसा हातभार लागावा, या उद्देशाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी असणार नो व्हेईकल डे

- मनपा आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा अनोखा उपक्रम

- नाशिककरांनीही महिन्यातून एक दिवस खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन

Hingoli News: हिंगोलीत पोलीस प्रशासनाविरोधात महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

हिंगोलीत पोलीस प्रशासनाच्या विरोधात शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटल्या

विद्यार्थ्याच्या आत्महत्ये प्रकरणात आरोपींना दोन महिन्यापासून अटक होत नसल्याने आंदोलन

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढे महिला आंदोलकांनी घोषणाबाजी

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी विष्णू चाटेची पोलिस कोठडी आज संपणार

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची आज पोलीस कोठडी संपणार

कोर्टाने आज ६ जानेवारीपर्यंत दिली होती पोलीस कोठडी

आज दुपारी चाटेला केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करणार हजर

सूत्रांकडून मिळाली माहिती

Nagpur News: चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस यांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपेठ निवासस्थानी दाखल

Nagpur News: नागपूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त

नागपूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त

बॅरिकेटिंग करून घरासमोरील वाहतूक वळवली

भेटायला आलेलेल्या लोकांना परवानगी घेऊन सोडले जात आहे आत

Amravati News: अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर घसरले

अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर घसरले

वांगे ,पालक ,टमाटर कोथिंबीर ,गोबी फक्त दहा रुपये किलोवर

भाव घसरल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघेना

बाजारपेठेमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव घसरले

Beed News: वाल्मीक कराडसोबत फोटो काढणे आले अंगलट, API महेश विघ्ने यांची उचलबांगडी

बीड - वाल्मीक कराडसोबत फोटो काढणे आले अंगलट

जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर उचलबांगडी

API महेश विघ्ने यांच्यासह दोघांना sit तून बाजूला सारले

API महेश विघ्ने यांचा वाल्मीक कराडसोबत होता फोटो

हवलादार मनोज वाघ यांनाही बाजूला सारले

Pune News: पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दुर्गम वाकांबे जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दुर्गम वाकांबे जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची जिज्ञासा आणि आवड निर्माण व्हावी यासाठी, सायबेजआशा संस्थेच्या ३५ उत्साही अभियंत्यांनी सुट्टीच्या दिवशी रंगरंगोटी उपक्रम राबवत, स्वतः ब्रश हातात घेत रंगवल्या शाळेच्या भिंती

शाळेच्या भिंतींवर विज्ञान, गणित आणि सामान्य ज्ञान यावर आधारित रंगीत आणि शैक्षणिक अशी रेखाटली चित्रे

मूल्यशिक्षण आणि अभ्यासक्रमावर आधारित थीम्स वापरून आकर्षक पद्धतीने रंगवल्या भिंतीं

शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनीही उपक्रमात उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग

Pune News: पुण्यातील भोरमध्ये चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग

पुण्यातील भोरमध्ये चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग

पुण्यातील भोर तालुक्यातल्या सांगवीतील घोरेपडळ गावातील घटना

जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला विजेच्या तारांचे घर्षन झाल्याने लागली आग

चारा जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 10 जणांना घेतला चावा

- त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 10 जणांना घेतला चावा

- मंदिराच्या दर्शन रांगेतील रविवारी संध्याकाळची घटना

- यामध्ये पाच मुलांसह शालेय मुलाचा समावेश

- जखमींवर त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले उपचार

Nagpur News: नागपूर पुन्हा गारठा, पारा 8.8 अंशावर

- नागपूरात गारठा कायम पारा पुन्हा 8.8 अंशावर

- दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरणारी थंडी

- पुढील 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

- उत्तर भारतातील हिम वृष्टीचा परिणाम विदर्भावर, विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पारा 10 अंशाच्या खाली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.