भारतात आलेल्या नवीन व्हायरस बद्दल सरकार गांभीर्याने दखल घेत आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्य सरकार प्रत्येक नागरिकाची चांगली काळजी घेईल.
येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. बैठकीनंतर या रोगाबद्दल घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दलचे निर्देश जाहीर केले जातील. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
Delhi Vidhan Sabha Election : 1.55 कोटी मतदार ठरवणार दिल्ली सरकार; निवडणूक आयोगाने जाहीर केली अंतिम मतदार यादीदिल्ली विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असून निवडणूक आयोगाने मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांना मिळाला जामीनप्रशांत किशोर बीपीएससी उमेदवारांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते. सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली होती. त्या केसमध्ये प्रशांत किशोर यांना पाटणा सिव्हिल कोर्टातून जामीन मिळाला आहे.
Delhi Election : दिल्लीत 'आप'नंतर काँग्रेसने जाहीर केली 'प्यारी दीदी योजना' ; महिलांना दरमहा मिळणार 2500 रूपयेदिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आज मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीच्या महिला सन्मान योजनेला शह देण्यासाठी दिल्लीतील काँग्रेसच्या कमिटीने 'प्यारी दीदी योजना' जाहीर केली आहे.
Central Budget 2025 : एक फेब्रुवारीला मांडला जाणार देशाचा अर्थसंकल्पसंसदेच्या विशेष अधिवेशनात एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थ मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडणार आहे.
Dharashiv BIG News : धारशिवमध्ये दोन गटात हाणामारी, 4 जणांचा मृत्यूधाराशिव जिल्यात धक्कादायक घटना घडली आहे. पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शेतात पाणी देण्यावरून मध्यरात्री रात्री ही घटना झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 10 आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Devendra Fadnavis News Nagpur : नागपूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्तनागपूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त
बॅरिकेटिंग करून घरासमोरील वाहतूक वळवली
भेटायला आलेलेल्या लोकांना परवानगी घेऊन सोडले जात आहे आत
Santosh Deshmukh : देशमुख हत्या प्रकरणात येत्या 10 जानेवारीला धाराशिव येथे सर्व पक्षीय मोर्चाबीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विविध मागण्यासाठी धाराशिवमध्ये येत्या 10 जानेवारीला सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते आणि नागरिक सहभागी होतील.
SIT तून तिघांची उचलबांगडी, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा : संभाजीराजेसंतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमलेल्या SIT पथकावरून अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर तिघांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांच्यासह आणखी एकालाही एसआयटीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागमी संभाजीराजे यांनी केली आहे.
New virus like Corona : भारतात कोरोना सारखा नवा विषाणू दाखल? पहिला रूग्णही सापडलाअख्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यामुळे अख्खं जग लॉकडाऊन झालं होतं. आता चिनमध्ये HMPV कोरोना सारखा नवा विषाणू सापडल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले होते. दरम्यान HMPV कोरोना सारखा हा विषाणू भारतात पोहचला आहे. बंगळूरूमध्ये पहिला रूग्ण सापडला असून चिमुकल्या मुलीला याची लागण झाली आहे.
Beed Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरण : सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणारराज्यासह देशभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आक्रोशमोर्चे काढले जात आहेत. यानंतर आज (ता.6) सर्वक्षीय शिष्टमंडळ हे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष, पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते असतील.
Ladki Bahin Yojana : आश्वसनाप्रमाणे २,१०० रुपये मार्चमध्ये देणार; ? फडणवीस यांच्या मंत्र्याचा दावामहायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यातील पात्र लाडक्या महिलांना 2100 रूपये दिले जातील, असा दावा महायुती सरकारमधील एका मंत्र्याने केला आहे. यामुळे राज्यातील लाखो पात्र महिलांना आता लवकरच 2100 रूपये थेट खात्यावर मिळण्याची शक्यता आहे.
Santosh Deshmukh Murder Case: सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणारमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल के.सी. राधाकृष्णन् यांना भेटणार आहे. काल पुण्यात देशमुख हत्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्यांनी देशमुख यांच्या आरोपींना फाशी द्या, अशी मागणी केली आहे.
Eknath Shinde Receives Death Threat: युवकाकडून जीवे मारण्याची धमकीराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परेश चाळके यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर संबधित २४ वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याची धमकी या युवकाने दिली आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांने समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलेले आहे. कर्तव्यात कुचराई करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई केली आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. देशमुख हत्येनंतर बीड पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदली केली होती.