Ajay Devgn: 'आझाद'चा धमाकेदार ट्रेलर लाँच; अजय देवगणची घोड्यासोबत एन्ट्री, पाहा VIDEO
Saam TV January 07, 2025 06:45 PM

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो अजय देवगण (Ajay Devgn) आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय आपल्या ॲक्शन मोडने चाहत्यांना घायाळ करतो. तो कायमच प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत आला आहे. अजय देवगण अलिकडेच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला.

आता 'आझाद' (Azaad) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपटाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या चित्रपटात बॉलिवूडचे अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण या चित्रपटात दिसणार आहे. तसेच रविना टंडनची लेक राशा थडानी देखील या चित्रपटात आहे.

'' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. या ट्रेलर लाँचचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यातील एक व्हिडीओमध्ये चक्क चित्रपटातील कलाकर घोड्यासोबत फोटोशूट करताना पाहायला मिळत आहे. अजय देवगण घोड्यासोबत एन्ट्री घेतो. या चित्रपटात खूप महत्त्वाचा आहे.

'आझाद' चित्रपट हा 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणचा नवीन वर्षातील हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून राशा थडानी आणि अमन देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 'आझाद' चित्रपटात एका घोडेस्वाराची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात घोडेस्वाराच्या भूमिकेत अजय देवगण पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.