सूरज आर. बडजात्या यांची सिरीज 'बडा नाम करेंगे'च्या हृदयस्पर्शी कथानकामध्ये भारावून जा. जेथे प्रेम, कुटुंब व परंपरामधून नात्यामधील खास भावना दिसून येतात. मोहक रितिक घनशानी आणि उत्साही आयेशा कडुस्कर यांनी साकारलेल्या भूमिका रिषभ व सुरभी तुम्हाला हास्य, भावूक व संस्मरणीय क्षणांच्या प्रवासावर घेऊन जाण्यास सज्ज आहेत. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण दिवस जवळ येतो, तसा त्यांचा गतकाळ त्यांच्यासमोर उभा राहतो आणि त्यांनी त्यांच्या मनाचे ऐकावे की त्यांच्या कुटुंबांच्या इच्छांचा मान राखावा हे ठरवावे लागते.
उत्साहपूर्ण घटना व रहस्यमय शोधांदरम्यान आणि सुरभीला समजते की म्हणजे फक्त परंपरा नाही, तर संकटामध्ये एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे. रितिक घनशानी आपली भूमिका रिषभबाबत सांगताना म्हणाले, "रिषभला आपल्या जीवनप्रवासामध्ये वैयक्तिक इच्छा आणि कुटुंबाच्या अपेक्षांमध्ये संतुलन राखण्याचा संघर्ष करावा लागतो. रतलाममध्ये मोठा झालेला तो दयाळू, प्रेमळ व्यक्ती आहे, पण त्याच्या कुटुंबाच्या त्याच्यासाठी असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागतो."
पुढे रितिक म्हणाला, "रिषभला त्याच्या कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमामुळे कधी-कधी दुहेरी जीवन जगावे लागते, इतरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ओळख सिक्रेट ठेवावी लागते. पण या सर्व घडामोडींमध्ये खरे प्रेम शोधण्यासोबत स्वत:शी प्रामाणिक राहण्याचा त्याचा प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून घेतो. या कथानकामध्ये प्रेम, प्रामाणिकपणा आणि आजच्या विश्वामध्ये कौटुंबिक संस्कारांच्या संतुलनाचे महत्त्व दाखवण्यात आले आहे. माझा आहे की, प्रेक्षक प्रेमाचा शोध घेण्यासोबत आपल्या संस्कृतींशी बांधील राहण्याच्या त्याच्या प्रवासामध्ये भारावून जातील."
आयेशा कडुस्कर आपली भूमिका सुरभीबाबत सांगताना म्हणाल्या, "सुरभी आधुनिक विश्वातील प्रेम व कौटुंबिक मूल्यांची खरी प्रतीक आहे. उज्जैनमध्ये मोठी झालेल्या तिच्यामधून लहान शहरातील मुलीची ताकद दिसून येते, आव्हानात्मक काळात स्वत:शी प्रामाणिक राहण्याची तिची क्षमता तिला इतरांपेक्षा वरचढ ठरवते. रिषभसोबतचे तिचे नाते परस्पर आदर, विश्वास व पाठबळाचे आहे, जेथे ते एकत्र जीवनातील चढ-उतारांचा सामना करतात."
शेवटी आयेशा म्हणाली की, "सुरभीच्या माध्यमातून ही सिरीज प्रेम व कुटुंबामधील नातेसंबंधांना दाखवते, तसेच आपल्याला शिकवण देते की आपल्या स्वत:शी प्रामाणिक राहणे अर्थपूर्ण नाते घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. मी ही प्रबळ, कुटुंब-केंद्रित भूमिका प्रत्यक्षात सादर करण्यास उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक सुरभीच्या प्रेम व विकासाप्रती प्रवासाशी जुळून जातील."
पलाश वासवानी दिग्दर्शित सिरीज 'बडा नाम करेंगे' प्रेमाचे साजरीकरण आहे, जी अपेक्षांना आव्हान करते आणि कुटुंबाशी संलग्न राहण्याच्या महत्त्वाला सादर करते. ही सिरीज प्रथांसोबत दोन प्रेमीयुगुलांमधील दृढ नात्यामध्ये दिसून येणाऱ्या खऱ्या प्रेमाची आठवण करून देते. रिषभ व सुरभी त्यांच्या मनाचे ऐकतील का? त्यांचा प्रवास तुमचे लक्ष वेधून घेईल आणि तुम्हाला प्रेम व कुटुंबाच्या ताकदीची आठवण करून देईल.