टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह याने इतिहास घडवला आहे. बुमराहने या कामगिरीसह सर्व विक्रम मोडीत काढत धमाका केला आहे. बुमराहने सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाचव्या आणि अंतिम तसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. बुमराहला या 2 विकेट्सचा फायदा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये झाला आहे. आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. बुमराह या क्रमवारीत सरस ठरला आहे. बुमराहच्या रेटिंग पॉइंट्समध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत 1 अंकाने वाढ झाली. यासह बुमराहने त्याचं पहिलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.
आयसीसीने बुधवारी 8 जानेवारीला कसोटी क्रमवारी जाहीर केली. बुमराहला वाढीव 1 पॉइंट मिळाला आहे. त्यामुळे बुमराहच्या खात्यात 908 रेटिंग पॉइंट्स आहेत. बुमराहची आणि टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा एकमेव आणि पहिलवहिला खेळाडू ठरला आहे. बुमराहची ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
बुमराहच्या नावे गेल्या आठवड्यात आयसीसी टेस्ट रॅकिंग जाहीर झाल्यानंतर 907 रेटिंग पॉइंट्स होते. बुमराहने तेव्हा आर अश्विन याचा विक्रम मोडीत काढला होता. अश्विनची कारकीर्दीतील 904 ही बेस्ट रँकिंग होती. अश्विनने ही कामगिरी 2016 साली केली होती.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलँड याने या क्रमवारीत मोठी झेप घेतली. बोलँडने टॉप 10 मध्ये धडक मारली आहे. बोलँडने 29 स्थानांची झेप घेतली आहे. बोलँड आणि रवींद्र जडेजा संयुक्तरित्या नवव्या स्थानी विराजमान आहेत.
कसोटी क्रमवारीत कोण कुठे?
जसप्रीत बुमराहने कसोटी क्रमवारी गोलंदाजांच्या यादीतील त्याचं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एका स्थानाची झेप घेतलीय. पॅट दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडची 2 स्थानांनी घसरण झाली आहे. हेझलवूडला 2 सामन्यांमध्ये खेळता न आल्याने हा फटका बसला आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेन याने पाचवं स्थान कायम राखण्यात यश मिळवलंय.