शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मुंबईत करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांवर आधारीत शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे निर्मित ’मुंबईचा आदित्योदय 2025’ या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मुंबई आर्ट गॅलरी, वांद्रे पश्चिम येथे संपन्न झाला. यावेळी शिवसेना युवासेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई, किर्तिकुमार शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.