CA Exam : स्नेहल हिरे सणसवाडीतील पहिली सीए
esakal January 08, 2025 12:45 AM

शिक्रापूर - सहजपणे हाताला काम आणि उद्योगनगरीतील नोकरी-व्यवसाय संधी असलेल्या सणसवाडी (ता. शिरूर) येथे करिअरच्या वेगळ्या वाटा निवडण्याची मानसिकता दुर्मिळ आहे. मात्र शाळास्तरावरच सीए (सनदी लेखापाल) होण्याची मनीषा मनात बाळगून कुटुंबीयांना आणि आख्ख्या गावाला सीए होऊन दाखविण्याचा सणसवाडीतील पहिला प्रयत्न स्नेहल हिरे हिने यशस्वी करुन दाखविला. पर्यायाने २५ हजार लोकसंख्येच्या गावाच्या इतिहासात पहिली सीए होण्याचा मानही स्नेहल हिरे हिने पटकावला.

स्नेहल हिने तिने दहावीतच सीए व्हायचे ठरविले. माध्यमिक शिक्षण सणसवाडीत करुन पुढे पुण्यातील कर्वेनगर येथे मुलींच्या महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने बहिस्थ पद्धत निवडली.

पुणे विद्यापिठात तिने राहून स्वयंअध्ययनावर भर देवून आणि ऑनलाइन पद्धतीने खासगी क्लासमधून शिक्षण घेत पुण्यातील काही सनदी लेखापाल संस्थांमध्ये प्रॅक्टीस करुन ती नुकतीच सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. स्नेहलचे वडील अरुण हिरे एका कारखान्यात अधिकारी असून आई मनीषा गृहिणी आहे.

तिच्या या यशाबद्दल सरपंच रूपाली दरेकर, उपसरपंच राजुआण्णा दरेकर, पुणे नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, रांजणगाव देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर यांनी संपूर्ण हिरे कुटुंबाचा सन्मान केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.