शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे चोरट्यांनी घराची कौले काढून घरात शिरून कपाटातील दोन तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईल व सहा हजार रुपये रोख असा ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कुंडलिक यशवंत उर्फ बाळू देसाई (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना २० डिसेंबर रोजी दुपारी बारा ते अडीचच्या दरम्यान घडली आहे. शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की घरातील सर्वजण शेतात गेले होते. घराची कौले काढून कपाटातील गंठण, कानातील रिंग,चांदी व सोन्याचे दागिने,चार्जिंगला लावलेला मोबाईल; तसेच सहा हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. ही बाब त्यांना ट्रॅक्टरचे भाडे देण्यासाठी कपाट उघडल्यावर लक्षात आली. सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण खरात अधिक तपास करीत आहेत.