Health- हेल्दी सवयींच्या नादात व्हाल अनहेल्दी
Marathi January 08, 2025 12:24 PM

हल्ली सगळेजण फिटनेस फ्रीक झाले असून हेल्दी राहण्यासाठी डाएट करू लागले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की वजन कमी करण्याकरता किंवा फिटनेससाठी तुम्ही करत असलेले डाएट जर योग्य पद्धतीने होत नसेल किंवा तुम्ही झटपट रिझल्टसाठी अति डाएट फॉलो करत असाल तर हेल्दी होण्याऐवजी तुम्ही अनहेल्दी होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोणत्या चुकांमुळे या गोष्टी होतात ते बघूया.

जास्त पाणी पिणे

– जाहिरात –

डाएट करतेवेळी वजन कमी करण्यासाठी दिवसाला साडे चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण काहीजण साडेचार लिटर पेक्षा जास्त पाणी पितात. त्यामुळे वजन झटपट कमी होईल असे त्यांना वाटते.पण शऱीराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिल्याने आरोग्याचे नुकसान होते. जास्त पाणी पिल्याने किडनीवर ताण येतो. त्यामुळे हाइपोनैट्रेमिया होतो. ज्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण कमी होते.

उबदार
कोणताही व्यायाम करण्याआधी वार्म अप करणे आवश्यक असते. वार्म अपमुळे स्नायू आणि सांधे लवचिक होतात. त्यामुळे व्यायाम करणे सुलभ होते. पण जर तुम्ही वार्म अप न करताच व्यायाम केला. तर स्नायू आखडणे, मुरगळणे अशा समस्या निर्माण होतात.

– जाहिरात –

भरमसाठ प्रोटीन
प्रोटीनची शरीराला गरज असतेच. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही भरमसाठ प्रोटीन घ्यावे. सध्या बाजारातही प्रोटीन पावडरींच्या स्वरुपात सहज उपलब्ध आहे. त्यामुळे मसल्स वाढवण्यासाठी अनेक जण तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय प्रोटीन घेतात. पण याचा दुष्परिणाम होऊन किडनीसंदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. तसेच पाचनव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होतो.

पूरक
फीट राहण्याच्या नादात काहीजण तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय सप्लीमेंटस घेतात. त्यामुळे आपण फिट होऊ असे त्यांना वाटते. आता बाजारातही अशा अनेक प्रोटीन्स आणि सप्लीमेंटस इतर औषधांसह मिळू लागले आहेत. पण जर तुम्हाला त्याचे ज्ञान नसेल आणि डॉक्टरांच्या सल्लाशिवाय तुम्ही ते घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण त्याचे तीव्र दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात.

डाएटचा अतिरेक
वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही डाएट करत असाल तर चांगली गोष्ट आहे. पण डाएटचा अतिरेक करत उपाशी राहणे, अर्धपोटी राहणे, कमी खाणे यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे थकवा, मूड स्विंगबरोबरच अशक्तपणासारखे त्रास मागे लागतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.