बाजीराव सातपुते यांचा शनिवारी सन्मान सोहळा
esakal January 08, 2025 10:45 PM

पिंपरी, ता. ८ ः नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सेवानिवृत्ती आणि एकसष्टीनिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वडमुखवाडीतील संकल्प गार्डन कार्यालय येथे शनिवारी (ता. ११) हा कार्यक्रम होणार आहे. आमदार महेश लांडगे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे आदी उपस्थित असणार आहेत. सकाळी दहा वाजता वृक्षारोपण करण्यात येईल. त्यानंतर तळवडे येथील इंद्रायणी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी स्नेहभोजन होईल. सायंकाळी अभीष्टचिंतन सोहळ्यात बाजीराव सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात डॉ. राजेंद्र माने, डॉ. संभाजी सातपुते आणि महेंद्र भारती यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.