वडगाव मावळ, ता. ८ : महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून आंदर मावळातील दुर्गम शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वडेश्वर येथील उपक्रमशील अध्यापिका वनिता राजपूत यांना केंद्रस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वहाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे, शिंदेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता भोसले, माजी मुख्याध्यापिका भारती निगडे, जनाबाई कुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश वाडेकर, उपाध्यक्षा रेश्मा कुडे, सुधीर कुडे, विठ्ठल वाडेकर, काळुराम वाडेकर, चंद्रकांत निसाळ, पंढरीनाथ तनपुरे, अलका गरुड, अश्विनी भांगरे, गोकूळ लोंढे, भिमेश रोडगे, काळू गुनाट, रोहिदास लामगण, दिनेश बालवड आदी उपस्थित होते. वनिता राजपूत या वडेश्वर केंद्रातील टॅग या इंग्रजी भाषेतील उपक्रमाच्या प्रमुख असून त्यांनी अनेक प्रशिक्षणांमध्ये सुलभक म्हणून उत्तम कार्य केलेले आहे. यापूर्वी त्यांना मावळ पंचायत समितीचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्या विद्यार्थिप्रिय व उपक्रमशील शिक्षिका म्हणून परिचित आहेत. तानाजी शिंदे व अंबिका सुरम यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र माळी यांनी आभार मानले.