37129
आंबेडकर स्मारकाचा वर्धापन
साकेडी येथे उत्साहात साजरा
कणकवली, ता. ८ ः दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे साकेडी येथे महामाता भीमाई रामजी आंबेडकर स्मारकचा सहावा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी दि बुद्धिस्ट सोशल फाउंडेशनचे संदेश सावळाराम जाधव होते. तसेच कालकथित दिलीपराव आंबेडकर, स्नेहा आंबेडकर, अक्षता आंबेडकर, अक्षय आंबेडकर आदी उपस्थित होते.
भीमाई आंबेडकर स्मारकात प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी माजी राष्ट्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभा प्रभाकर जाधव, साकेडीचे सरपंच बंडू साटम, पोलिसपाटील शैलेश जाधव, संजय जाधव, किशोर गांगुर्डे, अमोल गायकवाड यांनी भीमाई स्मारकाच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले. मिलिंद जाधव, तुफान जाधव, आकाश जाधव, सागर जाधव, सुमेध जाधव, विश्रांती जाधव, स्मिता जाधव, संघमित्रा जाधव, प्रमिला जाधव, रेश्मा कांबळे, आम्रपाली जाधव आदींचा सत्कार करण्यात आला. बौद्धवाडी आणि साकेडी ग्रामस्थ मंडळ आदी उपस्थित होते.