भारत-ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताला 3-1 अशा पराभवाचा सामना करावा लागला. पण या मालिकेत भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) समावेश नव्हता. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. अलीकडेच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी शमीबद्दल वक्तव्य केले होते. शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याबाबत ते बोलले होते.
दुखापतीनंतर तंदुरूस्त झालेल्या शमीने देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असले, तरी तो अद्याप भारतीय संघात परतलेला नाही. दरम्यान, भारताच्या या वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजीऐवजी फलंदाजीतही चमत्कार करताना दिसत आहे.
खरे तर आजकाल मोहम्मद शमी (Mohammed Shami) बंगालकडून देशांतर्गत वनडे टूर्नामेंट विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये खेळत आहे. मध्य प्रदेशविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शमीने गोलंदाजी करताना फक्त 1 विकेट घेतली, पण त्याने बॅटने देखील चमत्कार केला आणि संघासाठी शानदार खेळी खेळली. या सामन्यात 8व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शमीने 34 चेंडूत 42 धावा केल्या. दरम्यान त्याने 5 चौकारांसह 1 षटकार लगावला.
यापूर्वी मोहम्मद शमी बंगालकडून देशांतर्गत टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळताना दिसला होता. आता तो संघासाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. एकीकडे शमी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतो, पण त्याला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आले नाही. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गोलंदाजाच्या फिटनेसबाबत माहिती देताना सांगितले होते की, त्याच्या गुडघ्यात काही समस्या आहे. यामुळे शमी विजय हजारे ट्राॅफी या स्पर्धेतील पहिले काही सामने खेळू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
नाथन स्मिथ बनला ‘सुपरमॅन’ हवेत उडत घेतला अविश्वसनीय झेल! पाहा VIDEO
आजच्याचदिवशी रोहित शर्मा बनला होता मुंबई इंडियन्सचा हिस्सा, फ्रँचायझीने शेअर केला 14 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास! VIDEO
पीसीबीची फजिती! पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद