Maharashtra Live Updates : दिल्लीत ठाकरे गट काँग्रेसऐवजी AAP ला पाठिंबा देणार
Sarkarnama January 09, 2025 03:45 PM
Sanjay Raut Live: पवार, ठाकरे सोडून जाणारे रावणाचे वंशज : राऊत

लोकसभा निवडणुकीच्या कठीण परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कष्ट करुन 8 खासदार निवडून आणले, त्यातले काही जण सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला.उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, असे राऊत म्हणाले.

Torres Scam News : टोरेस घोटाळ्याला वेगळं वळण;माजी सीईओंनी केलं तपास यंत्रणाना सतर्क

लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. १००० कोटींच्या टोरेस घोटाळ्याला वेगळं वळण लागलं आहे. माजी सीईओ तुआसेफ रेयाज यांनी आधीच तपास यंत्रणाना सतर्क केल्याचा दावा केला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तपास यंत्रणांना मेल लिहून सतर्क केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर मास्टरमाईंड युक्रेनला पळून गेल्याचे समजते. अटक केलेल्यांमध्य एक जण रशिया तर दुसरा उझबेकिस्तनामधील आहे.

Sanjay Raut live: दिल्लीत आम्ही आपच्या सोबत राहू:राऊत

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची ताकद जास्त आहे. दिल्लीमध्ये आप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे दिल्लीत ठाकरे गट काँग्रेसऐवजी आपला पाठिंबा देणार आहे, याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेससोबत आहोत, पण दिल्लीत आम्ही आपच्या सोबत राहू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar live: प्रादेशिक कार्यालयाच्या बैठकीसाठी अजितदादा साखर संकुलात उपस्थित

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात साखर संकुल येथील प्रादेशिक कार्यालयाच्या कामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थित आहेत. अजितदादा साखर संकुलाचत येताच याठिकाणी काही काळ वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली. अजितदादा यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

Pravasi Bharatiya Divas 2025 Narendra Modi live: मोदींच्या हस्ते प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचे उद्धघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचे उद्धघाटन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी भारतात परत आले होते. यानिमित्ताने या दिवसाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक देशाचे नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Kolhapur Guardian Minister post Live News : कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेच

कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी 3 दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि कोथरूडचे आमदार तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे तिन्ही नेते कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता महायुतीतील वरिष्ठ नेते नेमकं कोणाला कोल्हापूरचं पालकत्व देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sujay Vikhe will meet Amit Shah : सुजय विखे पाटील घेणार अमित शाह यांची भेट

भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील शाह यांच्या निवासस्थानी आज ही भेट होणार आहे. नुकतंच सुजय विखे यांनी शिर्डीत येणाऱ्या भिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अशातच आता ते शहांची भेट घेणार आहेत. तर 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Santosh Deshmukh Murder Case Live News : सीआयडीकडून वाल्मिक कराडचे 3 मोबाइल जप्त

सीआयडीकडून वाल्मिक कराडचे 3 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या 3 मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे मोबाईल जप्त केले असले तरी अद्याप विष्णू चाटेचा मोबाइल तपास पथकाला मिळालेला नाही. विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराडने खंडणीसाठी फोनवर बोलल्याचे स्पष्ट होणार नाही? अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Tirupati Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.