फॅशन टिप्स: ट्रेंडी आई डॉटर मॅचिंग ड्रेस
Marathi January 09, 2025 04:24 PM

आई ही अशी व्यक्ती आहे जी कधीही स्वतःबद्दल विचार करत नाही आणि आपल्या घरासाठी व मुलांसाठी नेहमीच आपल्या जीवनाचा त्याग करण्यासाठी तयार असते. आई हा शब्द असा आहे ज्याची व्याख्या तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक आई प्रत्येकासाठी विशेषत: मुलींसाठी सुपरमॉम असते. आई आणि मुलगी यांच्यातील प्रेम हे थोडे वेगळे असते. त्यांच्यात अतूट बंध असतो. कारण मुलगी म्हणजेच आईची प्रतिमा असते
आणि मुलीलाही नेहमीच तिच्या आईसारखंच दिसायचं असतं. आई जे जे करेल ते ते करायचं असतं. जर तुम्हालाही तुमच्या आईसारखे दिसायचे असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलीसोबत सारखाच पोशाख परिधान करायचा असेल तर जाणून घेऊयात अशा काही आऊटफिट आयडियाज विषयी.
तुम्ही तुमच्या आईसोबत किंवा मुलीसोबत मॅचिंग आउटफिट्स स्टाईल करू शकता. आजकाल ट्विनिंग ड्रेसेसचा खूप ट्रेंड पाहायला मिळत आहे. पाहूयात नक्की हा ट्रेंड काय आहे.

पलाझो सूट:

आजकाल पलाझो सूटस खूप ट्रेंडमध्ये आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आई/ मुलीसोबत मॅचिंग पलाझो सूट घालू शकता . पलाझोमध्ये तुम्ही आणि तुमची आई खूप स्टायलिश दिसाल. तुम्ही हलक्या रंगाचा साधा पलाझो सूट घालून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तुमचा लूक स्टायलिश बनवण्यासाठी तुम्ही दोघेही तुमचे केस मोकळे ठेवू
शकता.

– जाहिरात –

काळा पोशाख :

फॅशन टिप्स : ट्रेंडी आई मुलीला मॅचिंग ड्रेस
प्रतिमा स्त्रोत: सोशल मीडिया

आजकाल ब्लॅक आउटफिटचा खूप ट्रेंड पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुमचा लूक स्टायलिश करण्यासाठी तुम्ही तुमच्या आईसोबत काळ्या रंगाचा पोशाख घालू शकता. काळ्या ड्रेसमध्ये पलाझो सूट, पँट सूट तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन ते खरेदी करू शकता.जर तुम्हाला बाजारात असा कोणताही ड्रेस सापडत नसेल तर तुम्ही कापड आणून शिलाई करून घेऊ शकता. मकर संक्रांतीसाठी तुम्ही पारंपरिक नक्षीकामही तुमच्या ड्रेसवर करून घेऊ शकता.

आईची आवड :

फॅशन टिप्स : ट्रेंडी आई मुलीला मॅचिंग ड्रेस
प्रतिमा स्त्रोत: सोशल मीडिया

जर तुमची आई थोडी मॉडर्न टाईप असेल तर तुम्ही काही वेस्टर्न ड्रेसही तुमच्या आईकरता निवडू शकता. तुम्हाला अनेक प्रकारचे वेस्टर्न ड्रेस मिळतील, पण तुम्ही चेक्स डिझाईनमधील कोणताही पोशाख खरेदी करू शकता आणि तो परिधान करू शकता. कारण आजकाल चेक्स डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही यावर हलकासा मेकअप आणि ट्विनिंग हेअरस्टाईल देखील तयार करू शकता.

– जाहिरात –

हेही वाचा : Parenting Tips : नावडत्या गोष्टी मुलांसमोर अशा मांडा


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.