मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रम आता लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर पाहता येणार आहे. या कार्यक्रमात मराठी कलाकारांनी तुफान मजा केलेली पाहायला मिळत आहे. नात्यांचा उत्सव पाहण्यासाठी चाहते देखील आता खूप आतुर आहे. मात्र याची एक झलक 'झी मराठी'ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
स्पेशल कार्यक्रम गाणी, डान्स, खेळ आणि भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. व्हिडीओमध्ये कलाकार तुफान डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओतील एका डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा भन्नाट डान्स पाहून तरुणाई लाजेल असे म्हणायला काही हरकत नाही. मराठी ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar ) यांनी आपल्या डान्सचे सर्वांना वेड लावले आहे.
अभिनेते आणि अभिनेत्री सविता मालपेकर 'पुष्पा 2' गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2'मधील 'अंगारो सा…' या गाण्याची हुक स्टेप्स करताना ते दिसत आहे. 'पुष्पा' स्टइलमध्ये गिरीश ओक मंचावर एन्ट्री घेतात. 'पुष्पा' ची 'झुकेगा नहीं साला...' पोज देताना ते पाहायला मिळत आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री 'श्रीवल्ली'च्या स्टाइलमध्ये गिरीश ओक यांच्यासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे.
डान्ससाठी यांनी पुष्पा आणि श्रीवल्लीसारखा लूक केला होता. गिरीश ओक यांनी डान्ससाठी फ्लॉवर प्रिंट निळा शर्ट, गळ्यात चैन, हातात अंगठ्या, गॉगल लावून डॅशिंग लूक केला आहे. तर सविता मालपेकर यांनी दाक्षिणात्य स्टाइलमध्ये साडी नेसून केसात गजरा माळला आहे. दोघांच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गिरीश ओक सध्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर 'शिवा' मालिकेत आजीच्या भूमिकेत अभिनेत्री सविता मालपेकर पाहायला मिळत आहे. मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रम 12 जानेवारीला पाहायला मिळणार आहे.