विजय हजारे ट्रॉफीत मोहम्मद शमीने असा काढला राग! फलंदाजाकडून आधी तोडफोड, मग..
GH News January 09, 2025 08:11 PM

देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने सुरु आहेत. उप उपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी बंगाल आणि हरियाणा हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना हरियाणाने 72 धावांनी जिंकला. पण सर्वांचं लक्ष हे बंगालकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीकडे होतं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बंगालने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सुदिप कुमार घरामीने पहिलंच षटक मोहम्मद शमीकडे सोपवलं. पण पहिल्या षटकात चमत्काराऐवजी भलतंच घडलं. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीला 14 धावा पडल्या. त्यानंतर पुन्हा एकदा संघाचं तिसरं षटक त्याच्याकडे सोपवलं. मात्र हे षटक पहिल्या षटकापेक्षा अजून महाग पडलं आणि 27 धावा गेल्या. अर्श रांगाने या षटकात मोहम्मद शमीला दोन षटकार मारेल. त्यामुळे मोहम्मद शमीचा आज काही दिवस नाही असं वाटत होतं. पण वैयक्तिक तिसरं आणि संघाचं सातवं षटक टाकण्यासाठी आला आणि फासे पालटले.

सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिमांशुला बाद केलं. तर शमीसोबत गोलंदाजी करणाऱ्या मुकेश कुमारने अर्श रांगाला बाद करत उरली सुरली कसर भरून काढली. मोहम्मद शमीने पहिल्या तीन षटकात धावा दिल्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या दोन षटकात फक्त 5 धावा देत रिकव्हर केलं. इतकंच काय तर 5 षटकात 32 धावा देत 1 गडी बाद केला. मोहम्मद शमीने संपूर्ण सामन्यात 10 षटकं टाकली आणि 31 धावा देत 3 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 6.10 इतका होता. या स्पेलमध्ये त्याने 5 वाइड चेंडू टाकले.

दरम्यान, हरयाणाने 50 षटकात 9 गडी गमवून 298 धावा केल्या आणि विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही बंगालला गाठता आलं नाही. 43.1 षटकात संपूर्ण संघ 226 धावांवर बाद झाला. हरयाणाने हा सामना 72 धावांनी जिंकला. या सामन्यात मोहम्मद शमीने 6 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा करून बाद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमी फिटनेस आणि गोलंदाजीची धार पाहण्याची ही रंगीत तालीम होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीत मोहम्मद शमीची निवड होते की नाही ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बंगाल (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, सुदीप कुमार घरामी (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, सुदीप चॅटर्जी, अनुस्तुप मजुमदार, करण लाल, सायन घोष, प्रदिप्ता प्रामाणिक, कौशिक मैती, मोहम्मद शमी, मुकेश कुमार.

हरयाणा (प्लेइंग इलेव्हन): अर्श रंगा, हिमांशू राणा, अंकित कुमार (कर्णधार), निशांत सिंधू, राहुल तेवतिया, दिनेश बाना (विकेटकीपर), पार्थ वत्स, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अमित राणा, अमन कुमार.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.