पुणे: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पाच माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात घेतलेला प्रवेश, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण करणारा दिसून येत आहे. पुण्यातील (Pune Politics) राजकारणात याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत, कारण कार्यकर्त्यांनी फ्लेक्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षप्रवेशाआधी देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षात इच्छुकांची रांग असताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश का दिला जात असल्याची चर्चा आहे. ‘दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों’, असे शेरो शायरीच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात फ्लेक्सद्वारे त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश बीडकर यांचे सहकारी विशाल दरेकर यांनी हे फ्लेक्स पुण्याच्या मध्यवस्तीत लावले असून, त्यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना एक अप्रत्यक्ष संदेश दिला जातोय, अशी चर्चा आहे. महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांचे सहकारी दरेकर यांच्याकडून फ्लेक्स लावण्यात आले असून, यावर पक्षप्रवेशाबाबत थेट काही लिहिण्यात आले नसले तरी, यामुळे पुण्याच्या राजकारणात महानगरपालिकेच्या अनुषंगाने तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पक्षामधील वाद आणि संघर्ष पुण्यातील स्थानिक नेत्यांमध्येही उफाळून येत आहेत. आगामी काळात या संघर्षामुळे आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशच होताच भाजपमधील खदखद चव्हाट्यावर
पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशच होताच भाजपमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये पक्ष प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करणारे पोस्टर भाजप पदाधिकाऱ्यांनी लावल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. ही नाराजी विविध माध्यमातून पुण्यातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत.
ज्या कार्यकर्त्यांनी हे झाड जपलं त्यांच्यावरती महापालिका निवडणुकीला फळ चाखण्याची वेळ आली तेव्हा इतर पक्षातील लोकांना संधी देण्यात येत असल्याची खंत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता या पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजप कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस विशाल दरेकर यांच्या माध्यमातून फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवर “दुश्मनी जमकर करो… दुश्मनी जमकर करो… लेकिन यह एहसास रहे, जब दोस्त बनजाये तो शरमिंदा ना हो…” असा मजकूर फ्लेक्सवर छापण्यात आला आहे. या माध्यमातून झालेल्या पक्षप्रवेशाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबईत पार पडला आहे. त्यामुळे उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवक आणि पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे. त्यामुळे आता संबंधित प्रभागातील इच्छुकांनी आपली खदखद व्यक्त करायला सुरूवात केली आहे.
अधिक पाहा..