Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं
Marathi January 09, 2025 08:24 PM

परभणी : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि परभणीती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावरुन जनआक्रोश मोर्चांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. या जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात भाषणेही केली जात आहेत. आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत वाल्मिक कराड (Walmik karad) व मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, आता या जनआक्रोश मोर्चाच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चे काढले जात आहेत. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे आमदार धस, अंजली दमानिया व मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध ह्या मोर्चातून आवाज उठवला जात आहे. मात्र, परभणी शहरात आज दलित कार्यकर्त्यांनी या मोर्चात लक्ष्मण हाके हातातील माईक घेत त्यांचं भाषण थांबवल्याचं पाहायला मिळालं. वाल्मिक कराडचं समर्थन तुम्ही करत असून तुम्ही भाजपचं काम करता, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून मागच्या 25 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. आज याच आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले होते. मात्र, यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी हाकेंचे  भाषण थांबून तुम्ही वाल्मिक कराड यांची बाजू घेता, तुम्ही भाजपचे हस्तक असून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकाकडून करण्यात आला. यावेळी आरपीआयचे नेते सचिन खरात यांनीही हाकेंना तुम्ही चळवळीतील नेते आहात, तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेऊ नका अन्यथा आम्ही तुमच्यासोबत नाहीत असा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, यानंतर लक्ष्मण हाकेंनीही शेवटी स्पष्टीकरण दिले असून, मी ना भाजपचा हस्तक आहे, ना कार्यकर्ता, मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतली नाही. त्यांच्यासोबत केवळ माझेच फोटो नाहीत, तर शरद पवार, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांचाही फोटो सर्वांना समान न्याय द्या. मी इथे सोमनाथ सूर्यवंशी यांची खाकी वर्दीकडून हत्या झालीय त्यामुळे 450 किलोमीटर वरून सोमनाथ आणि वाकोडे साहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे, असे म्हटले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने कुणीही इथे बाहेरुन येवून राजकारण करू नये असे सचिन खरात आणि हाकेंना उद्देशून म्हटले.

हेही वाचा

परळीत करुणा शर्मांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा बुरखाधारी कोण?; सुरेश धसांनी नावासह सांगितलं

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.