मोहोळ : बालाघाटाच्या डोंगर रांगातील येडशी जंगलातून. धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात वावरत असलेला वाघाने. मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. परंतु बार्शी तालुक्यातील राळेरास मुंगशी परिसरात वैराग ढोराळे मार्गे वाघाने प्रतीचा प्रवास सुरू केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील भोगावती नागझरी नदी परिसरातील वाळुज, देगाव, नरखेड , भैरववाडी व मनगोळी शेतकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.
मोहोळ माढा बार्शी उत्तर सोलापूर तालुक्यातील सीमावती भागात वाघाच्या आगमनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. राळेरास (ता. बार्शी) येथील हल्ल्यानंतर वाघाने भोगावती नदी मार्गे सासुरे येथे मार्गक्रमण करीत पोहोचला होता.
बालाघाट डोंगर रांगात धाराशिव जिल्ह्यातील येडशी जंगलातून
बार्शी तालुक्यातील कारी व पांगरी परिसरात वाघाचे दर्शन झाले होते दरम्यान वनविभागाच्या कॅमेरा पाझर तलावाजवळ पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाचे छायाचित्रही वन विभागाच्या कॅमेरात कैद झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने सोलापूर, धाराशिव, पुणे व नगर या चार जिल्ह्यातील वन विभागाच्या टीमला पाचारण केले होते.
पांगरी भागातून बिबट्याने धूम ठोकून अदृश्य झाला होता. तर नंतर तो बार्शी तालुक्यातील राळेरास सासुरे व वैराग जवळील ढोराळे या गावातील बैलावर पाळीव हल्ला करुन गंभीर जखमी केल्यामुळे अदृश्य वाघाचे पुन्हा दर्शन झाले.
मोहोळ माढा बार्शी उत्तर सोलापूर या चार तालुक्याच्या सीमा वरती भागात मोहोळ तालुक्यातील भैरववाडी व नरखेड येथे चांगलाच धुमाकूळ घालून शेळीवर हल्ला केला होता त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये मोठे प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते. यातच पुन्हा मोहोळ बार्शी तालुक्याच्या सीमा लागत असणाऱ्या भोगावती नदी परिसरात प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाले.
त्याने पाळीव प्राण्यावर हल्ला हे केला त्यामुळे भोगावती व नागझरी नदी परिसरातील शेतकरी दिवसावर रात्रीच्या वेळेस शेतात जाण्यासाठी धजत नव्हते. परंतू वाघ भोगावती नदी मार्गे पुढे मार्गस्त झाला आसता तर वाळुज, देगाव, नरखेड, मलिकपेठ, भैरववाडी, मनगोळी या भागात दाखल झाला आसता.
परिणामी शेती व शेती जोड व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत होते परंतु चार तालुक्याच्या सीमावरती भागात बिबट्याचा बोलबाला कमी झाला असून आता वाघानेही परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुट्टीचा निस्वास सोडला.
पुन्हा येडशीच्या जंगलात जाईल : वनपाल, धनंजय शिधोडकर
वाघाने सासुरे येथून वैराग मार्गे ढोराळे असा परतीचा प्रवास सुरू केला. ढोराळे शिवारातील एका बैलावर हल्ला केल्यानंतर वाघाचे ठसे दिसेनासे झालेत. त्यामुळे वाघ पुन्हा परतीच्या मार्गावर असून आलेल्या मार्गावरून पुन्हा तो येडशीच्या जंगलात जाण्याची शक्यता असून. शेतकऱ्यांनी घाबरु नये. अशी माहिती वनपाल धनंजय शिधोडकर यांनी सांगितले आहे.