रानडुकरांच्या कळपाचा कांदा पिकात हैदोस
esakal January 10, 2025 02:45 AM

पारगाव, ता.९ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्या बरोबरच आता अन्य वन्य प्राण्यांमुळे देखील शेतकरी त्रस्त झाले आहे. रानडुकरांच्या कळपाने येथील चंद्रकांत खंडू गुणगे या शेतकऱ्याचे सुमारे दीड एकर कांद्याचे क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान केले. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
अवसरी बुद्रुक परिसरातील शेटे गुणगे मळा परिसर हा पूर्णपणे एका बाजूने डोंगराळ भाग असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राणी आढळत आहेत या परिसरातील अनेक शेतकरी यापूर्वी शेळ्या मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करत होते परंतु वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्याचे कळपच्या कळप संपूर्णपणे विकून तो व्यवसाय बिबट्याच्या भीतीने बंद केला.
चंद्रकांत गुणगे या शेतकऱ्याच्या एकाच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या एकूण दीड एकर क्षेत्रामधील सुमारे सव्वा ते दीड महिन्याच्या कांदा या पिकाचे नुकसान केल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी ही या घटनेची कल्पना वनविभागाला दिली असून वनरक्षक सी.एस. शिवचरण यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

बिबट्यानंतर रानडुकरांचा धसका
बिबट्याच्या भीतीनंतर आता शेतकऱ्यांनी रानडुकराच्या कळपामार्फत वारंवार होणाऱ्या शेती पिकाचा नुकसानीचा धसकाच घेतला आहे. अनेक उपाय करून देखील रानडुकराचे कळप शेतात उभ्या असणाऱ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हनुमंत वाघ यांच्या जनावरांच्या चारा पीक गवताचे संपूर्णपणे रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले होते. त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

संबंधित शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे अर्ज करून दिल्यास त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवून देण्यात येतील.
- प्रदीप कासारे, वनपाल
05047

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.