Sanjay Raut gave information about who the Thackeray group will support for the Delhi Assembly Election 2025 PPK
Marathi January 10, 2025 04:25 AM


आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडि आघाडीचे घटक असले तरी हे दोन्ही पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहे. ज्याबाबत इंडि आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीत सत्ता गाजवणाऱ्या आपला सत्ता कायम ठेवण्यात यश मिळणार की नाही, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडि आघाडीचे घटक असले तरी हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहे. ज्याबाबत इंडि आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण दिल्ली विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेमका कोणाला पाठिंबा देणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पण याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. तर काँग्रेस आणि आप हे दोन्ही आमचे मित्र आहेत. ज्यामुळे याबाबत विचार करून निर्णय घेऊ. मात्र, आपचे नेते आमच्या संपर्कात अधिक असतात, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut gave information about who the Thackeray group will support for the Delhi Assembly Election 2025)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 09 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी आमचा आपला पाठिंबा असल्याचे प्रसार माध्यमांसमोर म्हटले होते. ज्याबाबत खासदार राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, खासदार अनिल देसाई यांनी त्यांची भूमिका मांडली. पण आमच्या पक्षामध्ये याबाबत एक भूमिका स्पष्ट झालेली नाही. काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे. कारण महाराष्ट्रात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. केंद्रात आम्ही इंडि आघाडीसोबत आहोत. पण असे असले तरी केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हे आमच्या संपर्कात जास्त असतात. त्यांचे प्रमुख नेते म्हणजे संजय सिंग, राघव चढ्ढा यांचा शिवसेना पक्षासोबत जास्त संवाद आहे, अशी माहिती यावेळी राऊतांनी दिली.

– Advertisement –

हेही वाचा… Delhi Election 2025 : नवी लोकशाही देशात उदयास आली, ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

तर, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आप आणि काँग्रेस दिल्ली विधानसभेची निवडणूक एकत्र लढले असते तर चांगला निकाल मिळाला असता. पण दुर्दैवान महानगरपालिका, नगर पंचायत किंवा दिल्लीसारख्या लहान विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कार्यकर्त्यांच्या दबावामुळे किंवा ईर्ष्येमुळे या गोष्टी शक्य होत नाही. जे आज दिल्ली विधानसभेच्याबाबतीत काँग्रेस आणि आपमध्ये घडले आहे, ते उद्या मुंबई मनपा निवडणुकीत सुद्धा होऊ शकते. कारण लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी पक्षाला जास्तीत जास्त जागा लढणे, हे आवश्यक असतं, असे यावेळी राऊतांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे गट एकला चलो रे चा नारा देणार का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.

– Advertisement –

तसेच, इंडि आघाडी हे ईतिहास जमा झाले आहे, असे राजदचे नेते तेजस्वी यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, मला असे वाटत नाही आणि मी याच्याशी सहमतसुद्धा नाही. जेव्हा लोकसभा निवडणुका येतील, तेव्हा इंडि आघाडी पुन्हा निर्माण होईल. आजही ही आघाडी कायम आहे. कारण लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही इंडि आघाडी म्हणूनच काम करत आहोत. बिहारमध्ये उद्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यावर तेजस्वी यादव यांना तेव्हा हातमिळवणी करूनच निवडणुका लढवाव्या लागतील. जेडीयू किंवा भाजपासोबत लालू प्रसाद यादव निवडणुका लढणार नाहीत. या गोष्टी जर तरच्या असल्याने भाजपा किंवा एनडीए आहे, त्यांच्याविरोधात लढण्यासाठी विरोधकांची भक्कम एकजूट आवश्यक आहे. नाही तर मोदी किंवा अमित शहा आणि त्यांचा भस्मासूर पक्ष सर्वांना खाऊन टाकेल, असे यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.