Sara Ali Khan and Shubhaman Gill : भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल हा नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या उत्तम खेळामुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या त्याच्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सैफ अली खानची लाडकी सारा अली खानचा लग्नातील पोशाखात असलेला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे चाहते गोंधळात पडले असून या फोटोमागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि चा हा फोटो शुभमनच्या एका फॅनपेजने सॉरी फॅन्स असे लिहत पोस्ट केला असून हा एक एआय डीपफेक फोटो आहे. यामध्ये अभिनेत्री सारा अली खान सफेद लेहंगा परिधान केलेली दिसत असून तिने नो मेकउप लुक करत डायमंडचा नेकलेस कानातले आणि बिंदी घातली आहे. तर, शुभमनने देखील सफेद रंगाची शेरवानी घातली आहे.
या फोटोखाली चाहत्याने भरभरून कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक चाहते हे कधी झालं असे विचारात आहेत. तर काही चाहते असं झालं तर आम्ही खूप खुश होऊ असे लिहत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी एआय डीपफेक फोटोचे कौतुक करत उत्तम काम केल्याचे लिहिले आहे.
माहितीनुसार, हा फक्त एक एआय डीपफेक फोटो आहे आणि वास्तविक सारा अली खान आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत नाहीत. याबद्दल सारा कॉफी विथ कारणमध्ये 'सगळे जग चुकीच्या साराच्या मागे लागले आहे', असे म्हणाली होती. त्यानंतर या दोघांबद्दल कोणत्याही अफवा समोर आल्या नव्हत्या.