नागार्जुन अक्किनेनी हा साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. नागार्जुन यावर्षी आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही अभिनेता खूप तंदुरुस्त आणि सक्रिय आहे. अशा परिस्थितीत नागार्जुनने एका मुलाखती दरम्यान आपल्या शारिरीक आणि आरोग्याचे रहस्य सांगितले आहे. त्यांनी आपला फिटनेस मंत्र शेअर केला आहे.
View this post on Instagram
अभिनेता म्हणाला की तो गेल्या ३०-३५ वर्षांपासून कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करत आहे. महत्त्वाचे म्हणजे नागार्जुनने त्याच्या उत्साही आणि सक्रिय राहण्याचे रहस्य देखील उघड केले आहे. तो म्हणतो की, मी संपूर्ण दिवस सक्रिय असतो. जर मी जिमला गेलो नाही तर मी फिरायला किंवा पोहायला तरी जातो. तसेच ते नियमित व्यायामाच्या महत्त्वावर भर देतात आणि तो त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक नॉन-निगोशिएबल भाग मानतात.
पंजाबच्या गावामधुन ग्लोबल मंचावर, दिलजीत दोसांझची 'दिल-लुमिनाटी' टूरने घडवले नवे युगअभिनेता वर्कआऊटला प्राधान्य देतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी तो दररोज सकाळी ४५ मिनिटे ते १ तास स्वत:ला देतो. नागार्जुन संपूर्ण आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक मानत. त्याच्या व्यस्त वेळापत्रकातही तो व्यायामाला प्राधान्य देतो. तो शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही राखण्यासाठी आठवड्यातून ५ ते ६ दिवस दररोज सकाळी सुमारे एक तास व्यायाम करतो. ज्यामध्ये पोहणे आणि गोल्फ सारख्या गोष्टींचा समावेश होतो.
ए.आर. रहमान: आर्थिक संकटांवर मात करून संगीताचा राजाअभिनेता आपली बॉडी शेपमध्ये राहण्यासाठी खूप मेहनत घेतो. महत्त्वाचे म्हणजे तो कॅलरी प्रभावीपणे बर्न करण्यासाठी अनेक फिटनेस टिप्स देखील शेअर देखील केल्या आहेत. तो व्यायामा दरम्यान, हृदयाचे ठोके जास्तीत जास्त ७० टक्क्यापेक्षा जास्त राखणे, दीर्घ विश्रांती टाळणे आणि वर्कआऊट दरम्यान फोनकडे दुर्लक्ष करणे आणि आपल्या वर्कआऊटवर लक्ष केंद्रित करणे यावर तो भर देतो.
हेही वाचा : वरुण धवनचा 'बेबी जॉन' फ्लॉप, 10 व्या दिवशी कमाई लाखांवर आलीवयाच्या ६५ व्या वर्षीही तरुण आणि उत्साही दिसण्याचे श्रेय नागार्जुनने आपल्या संतुलित आहाराला दिले. मोठे झाल्यावर खाण्याच्या सवयी लावणे फार महत्त्वाचे आहे. तो रात्रीचे जेवण ७ किंवा ७.३० वाजता संपवतो. ही सवय तुमचा आहार आणि जीवनशैली योग्य मार्गावर घेऊन जाते. तसेच तो १२:१२ अधूनमधून उपवास पकडतो. जेथे तो १२ तास खातो आणि उर्वरित १२ तास उपवास करतो. तो अनेकदा आपल्या उपवासाचा कालावधी संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत १४ तासांनी वाढवतो.
हेही वाचा :महिन्याला 35 रुपये कमवणारे नाना पाटेकरांचा संघर्षातून 80 कोटींचा मालक होण्याचा प्रवासनागार्जुन दर रविवारी चीट डे करुन आहार घेतो. तो भरपूर मिठाई आणि चॉकलेट खातो.