Methi Matar Appe Recipe: हिवाळ्यात मटार आणि मेथी मोठ्या प्रमाणात विकायला येतात. मटार आणि मेथी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही सकाळी नाश्त्यात मटारपासून अप्पे तयार करू शकता. हे अप्पे डब्ब्यात किंवा नाश्त्यात खाऊ शकता. मटार अप्पे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
'मेथी मटार अप्पे' बनवण्यासाठी लागणारे साहित्यबारिक चिरलेली मेथी
हिरवी मिरची
आलं
कांदा पात
पीठ
बारिक केलेल मटार
जीर
ओवा
कोथिंबीर
मीठ
हळद
तिखट
पाणी
तेल
मेथी मटार अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी बारिक चिरलेली मेथी, हिरवी मिरची-आलं पेस्ट, कांदा पात, पीठ, बारिक केलेले मटार, जीर, ओवा, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट, पाणी टाकून मिश्रण चांगले एकजीव करा. नंतर अप्पे पात्र गरम करा. त्यात तेल टाकून गरम करा. त्यात तीळ टाका. नंतर मेथी मटार मिश्रण त्यात टाका आणि शिजू द्या. तुम्ही गरमागरम अप्पे दह्यासोबत खाऊ शकता.