हृतिक रोशनची ती चूक बेतली असती फरहान अख्तर आणि अभय देओलच्या जीवावर; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
esakal January 10, 2025 04:45 PM

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. 'कहो ना प्यार हैं ' पासून ते 'अग्निपथ' पर्यंत त्याच्या अभिनयाच्या कक्षा आणखीनच रुंदावत गेल्या. त्याचं देखणं रूप अनेक तरुणींच्या मनावर कोरलं गेलं. आजही हृतिक अनेकांचा ड्रीम बॉय आहे. त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर गारुड घातलं. आज हृतिक ५१ वर्षांचा झालाय. १० जानेवारी २०२५ रोजी हृतिक त्याच्या १ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जेव्हा त्याच्यामुळे फरहान अख्तर आणि अभय देओल मोठ्या संकटात संकटात सापडले होते.

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये हृतिक, फरहान आणि अभय यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यात त्यांच्या शूटिंगदरम्यानची मज्जा दाखवण्यात आलीये. अगदीच १ मिनिटांच्या असलेल्या या व्हिडिओमध्ये हे तिघेही शूटिंगमध्ये व्यग्र दिसतायत. या व्हिडीओमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतानाच सीन दाखवलाय. व्हिडीओ शेवट्पर्यंत पाहिल्यावर तो भयानक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा सीनमध्ये हृतिक रोशनला ऑफिसमधून एक फोन आलेला दाखवण्यात आलाय. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो.

हृतिक गाडीतून खाली उतरतो. पण गाडीतून उतरताना तो गाडीचा हँड ब्रेक लावायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. गाडी पुढे जातेय हे लक्षात येताच हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो. त्यानंतर फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय मात्र घाबरतो. असं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.

या सीनबद्दल अभय देओलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं होतं की, 'हा सीन शूट करण्यापूर्वी हृतिकने मी आणि फरहानला मरता मरता वाचलो होतो. फरहान हा माझ्यापेक्षा खूपच फास्ट होता. त्याने या सीनवेळी लगेच गाडीतून उडी मारली पण मी गाडीतच बसून राहिलो. तेव्हा मला वाटलं की मी आता मरणार आहे.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.