बॉलिवूडमध्ये आपल्या अॅक्शन सीने लाखो चाहत्यांच्या मनावर राज करणारा अभिनेता म्हणून कडे पाहिले जाते. हृतिक ने त्यांच्या फिल्मी कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हृतिक ने 2000 मध्ये कहो ना प्यार है या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली. धूम 2, वॉर आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील अॅक्टिंगस्टाईलने ऋतिकने मोठी फॅनफॉलोविंग केली आहे. हृतिकच्या अॅक्शनसीनचे चाहते आहेत.
हृतिक रोशनने 2013 साली स्वत:चा फिटनेस ब्रँड लॉन्च केला. या ब्रँडिंग कंपनीची एकूण संपत्ती 200 कोटी रूपये इतकी आहे. ज्यामधून हृतिक रोशन लाखोंची कमाई करतो.ब्रँड एंडोर्समेंट्समधून दरवर्षी भरपूर कमाई करतो. एका ब्रँडिंगसाठी हृतिक रोशन सुमारे 3 ते 5 कोटी रूपये घेतो. सोशल मीडियावर हृतिक रोशन हा सक्रिय असतो. इन्स्टाग्राम पोस्टसाठी हृतिक रोशन 4 ते 5 कोटी रूपये घेतो.
हृतिक रोशनची एकूण संपत्ती 3100 कोटी रूपये इतकी आहे. माहितीनुसार, एका चित्रपटासाठी हृतिक रोशन 65 ते 75 मानधन घेतो. फायटर या चित्रपटासाठी हृतिकने 50 कोटी रूपये फि घेतली होती.
हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या हृतिक त्याच्या 'वार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यात ज्युनियर एनटीआरही दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक आणि ज्युनियर एनटीआर आमनेसामने दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.