मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
Inshorts Marathi January 11, 2025 01:45 AM

मुंबई, दि. १० : सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतातील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor addresses ‘Hindu Spiritual and Service Fair’

Mumbai, 10th Jan : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan today addressed the grand ‘Hindu Spiritual and Service Mela 2025’ organized by the Hindu Spiritual and Service Foundation at Maharani Ahilyadevi Holkar Maidan in Goregaon Mumbai on Thu (9 Jan). The main objective of the 4 – day festival of Spirituality and Service is to preserve the rich social and cultural heritage of Sanatan Dharma.

Gunvant Singh Kothari, National Convenor of Hindu Spiritual and Service Foundation (HSSF), Sharda Bubna, CA K C Jain, Girish Shah, Co – Convenor Ashok Doshi, Suresh Bhageria and other dignitaries were present.

0000

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.