Maharashtra News Live Updates: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी रोहेकरांनी काढला मुकमोर्चा
Saam TV January 11, 2025 01:45 AM
Roha News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी रोहेकरांनी काढला मुकमोर्चा

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी रोहेकरांनी आपला संताप व्यक्त केला. आज संध्याकाळी रोहा येथे मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात नागरिक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी या घटनेचा निषेध करण्यात आला. खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल

जालना आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान तब्येत खालावल्याने छ. संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपचार सुकु झाले असून सलाईन लावण्यात आली आहे. रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत.

Mumbai : मीरारोडमधील टोरेस कार्यालयातील तिघांना पोलिसांनी केली अटक

मिरारोडमधील टोरेस कार्यालयातील तिघांना नवघर पोलिसांनी अटक केली.

मॅनेजर, कॅशियर आणि कार्यालय ज्यांच्या नावे भाडेतत्वावर आहे त्या महिलेला अटक झाली आहे .

त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची कोठडी मिळाली आहे.

या तिघांकडून २६ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मॅनेजरला मालाड, कॅशियरला मीरारोड आणि महिलेला ताडदेवमधून अटक केली आहे.

Bhiwandi : वालपाडा येथे साठवून ठेवलेल्या भंगाराला भीषण आग..

भिवंडी तालुक्यातील वालपाडा ग्रामपंचायत हद्दीतील एका भंगाराला भीषण आग.

भंगार पूर्णपणे जळून खाक, आग लागण्यामागील कारण अस्पष्ट

घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले, बचावकार्याला सुरुवात.

ऐतिहासिक बंगल्याला हात न लावता स्मारक बांधणार - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्याच्या जागी उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाविषयी दिली माहिती. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

- जुन्या महापौर बंगल्यात कामाला सुरुवात

- ऐतिहासिक बंगल्याला हात न लावता स्मारक बांधणार - उद्धव ठाकरे

- ४ भिंती आणि पुतळा म्हणजे स्मारक होत नाही.

- स्मारकाचं काम करणं जिकरीचं होतं, २३ जानेवारी आधी स्मारक पूर्ण होईल.

- वास्तूशी भावनिक बंध, महापौर बंगल्यात अनेक बैठका झाल्या होत्या.

Mumbai : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालकाचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.

अपघाताला बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेने केली होती जामीनची मागणी.

संजय मोरेच्या जामीन अर्जाला पोलिसांनी केला होता विरोध.

मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो पोलिसांनी व्यक्त केली होती भीती.

बसमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचा आरटीओचा अहवाल पोलिसांनी केला होता कोर्टात सादर.

९ डिसेंबरला झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले होते.

मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण : आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळला

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

अपघाताला बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेने केली होती जामीनची मागणी

संजय मोरेच्या जामीनाला पोलिसांनी केला होता विरोध

९ डिसेंबरला झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले होते

दिल्लीतील अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी धावणार विशेष रेल्वे

दिल्लीतील अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी धावणार विशेष रेल्वे

पुण्यातून दिल्लीसाठी विशेष ट्रेन

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती मागणी.

१९ फेब्रुवारी रोजी पुण्यातून ही विशेष ट्रेन सुटणार तर दिल्लीतून परत पुण्यासाठी ही रेल्वे २३ तारखेला सुटेल

महाराष्ट्रात सगळे विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलताय - नितेश राणे

महाराष्ट्रात सगळे विरोधक आता ईव्हीएमच्या नावाने बोंबलत आहेत.

ईव्हीएमला दोष देत आहेत. पण हिंदू समाजाने एकत्र येत मतदान केले हे त्यांना हजम होत नाही.

हिंदू समाजाने एकत्रित मतदान केले आहे. ईव्हीएमचा पूर्ण अर्थ आहे "एव्हरी वोट अंगेंस्ट मुल्ला" आहे.

त्यामुळे आम्ही ईव्हीएमवर निवडुन आलो आहोत, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

मुंबई ते शिर्डी पायी यात्रेत पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे दहा किलोमीटर अंतर बाकी असतानाच सुर्वेंच हृदयविकाराने निधन

Kolhapur : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून साळवण येथे रास्ता रोको आंदोलन

कोल्हापूर- गगनबावडा या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा केला.

या प्रकरणी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साळवण येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.

चांगल्या दर्जाचे काम होत नसल्याने ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी ठेकेदारांना फैलावर घेतले.

काम योग्य प्रकारे न झाल्या उग्र आंदोलन छेडण्याचा इशादा देण्यात आला आहे.

Uday Samant : अजित पवार हे धनजंय मुंडे यांचे नेते आहेत - उदय सामंत

मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली. त्यांना संतोष देशमुख प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा उदय सामंत यांनी 'अजित पवार हे धनजंय मुंडे यांचे नेते आहेत. एस. आय. टी. चौकशी सुरु आहे, कोणालाही यात सोडणार नाही असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी यावर बोलणं योग्य नाही. चौकशीला वेळ दिला पाहिजे. यावर निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय नक्की मिळेल', असे वक्तव्य केले.

Nashik : आदिवासी आश्रम शाळेत निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यावरुन आमदार हिरामण खोसकर आक्रमक

निकृष्ट दर्जाचं जेवण घेवून हिरामण खोसकर थेट आदिवासी आयुक्त कार्यालयात धडकले.

आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्या समोर ठेवलं निकृष्ट दर्जाचं जेवण.

आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्यावरून विचारला जाब.

Pune : राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पालिका आयुक्तासोबत स्वतंत्र बैठक

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पालिका आयुक्तासोबत स्वतंत्र बैठक.

पुण्यातील प्रलंबित प्रकल्प, रखडलेली विकास काम अश्या विविध मुद्द्यांवर बैठक घेतली जात आहे.

गेल्या आठवड्यात ही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याच मुद्द्यावर आयुक्तासोबत बैठक घेतली होती.

Abhimanyu Pawar: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आमदार अभिमन्यू पवारांवर निशाणा

अभिमन्यू पवार यांनी बीड जिल्ह्यात जाऊन भाषण दिलं..

कोपर्डी टू सारखे मोर्चे काढू सांगितलं..

मात्र त्यांच्यात लातूर जिल्ह्यातल्या 18 वर्षीय तरुणाचा प्रेमप्रकरणात मारहाणीत खून झाला त्या कुटुंबाला कधी भेटणार..

असा सवाल करीत लक्ष्मण हाके यांनी आमदार अभिमन्यू पवारांवर निशाणा साधलाय...

सामाजिक कार्यकर्त्यांना खालच्या जातीतील लोकांचा मृत्यू दिसतो का नाही असा अहवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय...

Jalna News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात जनआक्रोश मोर्चा

छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात....

मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहे...

दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशीच मागणी देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली आहे...

लग्न पत्रिकेतून पर्यवरणाचा संदेश व वृक्षलागवड, आगळीवेगळी लग्न पत्रिका

आधुनिकीकरणाच्या नावावर मोठं मोठ्या झाडांची कत्तल केली जातं आहे.

जेवढी वनसंपदा तोडली जातं आहे त्या प्रमाणात वृक्षाची लागवड होत नाहीय यामुळे पर्यावरणाचा समतोल राखल्या जातं नाहीय.

अश्यातच हिंगणघाट येथील लकी खिलोसिया या युवकाने आपल्या लग्नाची पर्यावरण पूरक पत्रिका छापली.

ही पत्रिका सध्या नागरिकांना पर्यावरणच संदेश सोबत वृक्ष लागवडीची प्रेरणाही देत आहे.

एक तरी झाड लावा असा संदेश येथील लकीने लग्न पत्रिकेतून दिला शिवाय पत्रिकेसोबत एक सीड बॉलही गिफ्ट दिला तर पत्रिकाही पर्यावरणाला साथ देणारी असल्याने सहजीवनात पदार्पण सृष्टीला नमन करीत असेच म्हणावे लागेल.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, खा. बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल

मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना माणूसकीला काळीमा फासणारी घटना

या प्रकरणी खा.बजरंग सोनवणे यांनी, राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट घेऊन केली होती.

या प्रकरणात आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला असून आता आयोगही स्वतंत्र चौकशी करणार आहे.

अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून देण्यात आलीय..दरम्यान मस्साजोग प्रकरणात मानवाधिकार आयोगात गुन्हा क्र.३३/१३/५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे. अशी देखील माहिती खासदार सोनवणे यांच्याकडून देण्यात आलीय..

Panvel News: पनवेल स्टेशन परिसरात परप्रांतीयाची दादागिरी समोर

परप्रांती्यांकडून मराठी कुटुंबाला मारहाण करत धमकी.

मराठी कुटुंब पनवेल स्टेशन परिसरात उदरनिर्वाहासाठी महिलांचे पर्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी गेले होते.

याच रागातून परप्रांतीय इसम आणि त्याच्या बायकोने मारहाण केल्याचा मराठी कुटुंबियांचा आरोप.

खान्देश्वर पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असून गुन्हा दाखल करण्यास नकार देत असल्याचा देखील मराठी कुटुंबाचा आरोप

Torres Scam : टोरेस घोटाळ्या प्रकरणी आता शिवाजी पार्क पोलीस देखील चौकशीच्या घेर्यात

एसीपी दर्जाचा अधिकारी करणार चौकशी

जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या व्यवस्थापकांना बजावले होते समन्स

टोरेसच्या बिझनेस मॉडेल संदर्भातील माहिती घेण्याकरिता बजावले होते समन्स

पोलीस ठाण्याला वेळोवेळी कागदपत्र दिल्याचा आहे टोरेसच्या अधिकाऱ्यांचा दावा

चौकशी झाली की नाही, त्यात नेमकं काय निष्पन्न झालं आणि चौकशी झाली असल्यास हा घोटाळा असल्याच पोलिसांच्या का लक्षात आल नाही या सगळ्याची होणार चौक

Jalna News: जालन्यात थोड्याच वेळात जनआक्रोश मोर्चाला होणार सुरुवात

छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार असून अंबड चौफुली येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे...

मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....

तर मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.....

जवळपास 16 अधिकारी 200 पोलीस कर्मचारी आणि रॅपिड ॲक्शन फोर्सची एक कंपनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे...

कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मराठा समन्वयकांना नोटीस दिल्या असून मोर्चाला अटी शर्तीसह परवानगी दिली आहे- डीवायएसपी, अनंत कुलकर्णी

Ratnagiri News: सरकारी वकील चिपळूणमध्ये लाचलुचपतच्या सापळ्यात जेरबंद

रत्नागिरी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांची कारवाई

ॲड. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी वर्ग 1, खेड

यांनी केस मिटवण्यासाठी 5,00,000/- रुपये लाच मागितली होती.

यामध्ये एक लाख पन्नास हजार लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले

हि कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव पर्यवेक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Ratnagiri News: निलेश राणेंकडून किरण सामंत यांच्या कन्येचे कौतुक

रत्नागिरी- कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार निलेश राणेंकडून किरण सामंत यांच्या कन्येचे कौतुक

अपूर्वा सामंत तुमच्या किंगमेकर आहेत, किरण सामंत तुम्हाला तुमच्या मुलींनी निवडणुन आणण्यासाठी जे काही काम केलं ते खरंच मोठं आहे.

बाबांना निवडून आणण्यामध्ये तुझा मोठा हात खरंच तुझे कौतुक

तुझ्या वयाचे आम्ही असताना आम्ही स्टेजवर यायचोच नाही

माझ्या वडिलांचा मला किंगमेकर कुणी सांगितले नाही पण तुमची मुलगी तुमच्यासाठी किंगमेकर

बाळासाहेब त्यावेळी दौरे काढायचे आम्ही त्यावेळी १२० व्या गाडीत असायचो

तु या वयात स्वतःला सिद्ध केलं तुझं कौतुक करावे तेवढे कमी

राजापूरमधल्या कार्यक्रमात आमदार निलेश राणेंचे वक्तव्य

Soalapur News: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभास सुरुवात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभास सुरुवात

राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये पार पडणार पदवीप्रधान सोहळा

तब्बल 15,219 विद्यार्थ्यांसाठी पार पडतोय पदवीप्रदान सोहळा

71 संशोधकांना पीएचडी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

Jalna News: धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख जालन्यात महा जनआक्रोश मोर्चासाठी दाखल

धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख जालन्यात महा जनआक्रोश मोर्चासाठी दाखल

थोड्या वेळात जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार

जनआक्रोश मोर्चासाठी सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय जालना शहरात दाखल झाले

Pune News: मुळशी तालुक्यातील निवे सारोळे गावाच्या परिसरामध्ये बिबटयाची दहशत

पुण्यातील मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या निवे सारोळे गावाच्या परिसरामध्ये बिबटयाची दहशत

गेल्या आठवड्याभरात शेळ्या, बकऱ्या, कोंबड्यांसह बिबट्याकडून अनेक पाळीव प्राणी फस्त

निवे सारोळे येथील टाटा धरणाच्या ऑफिस बाहेरील cctv मध्ये बिबट्याचा वावर कैद

परिसरातल्या गावातील नागरीक भीतीच्या छायेत

स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी सूचना दिल्यानंतर,वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला पकडण्यासाठी उपायोजना सुरू.

Pune News: काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश

पुण्यातील राजगड तालुक्यातले माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अमोल नलावडे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पुण्यातील सर्किट हाऊस येथे केला पक्षप्रवेश

पक्षप्रवेशाने राजगड तालुका काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे

विधानसभा निवडणूकित भोरच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या मांडेकर यांचा विजय झाल्यानंतर, राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढला..

नलावडे यांचा तालुक्यामध्ये युवा कार्यकर्ते म्हणून जनसामान्यांशी दांडगा संपर्क असल्यानं, पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार..

पक्षात झालेल्या ह्या इनकमिंगचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित राष्ट्रवादीला फायदा होणारं..

Satara News: पुणे -सातारा महामार्गालगत असलेले मेडिकल दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

पुणे -सातारा महामार्गालगत असणाऱ्या नसरापूर गावात मेडिकल दुकानं फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

दुकानाचे शटर उचकटना परिसरातील नागरिकांना आवाज आल्याने, दुकाना समोरील लाईट लावल्याने, दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी ठोकली धूम

नागरिकांच्या सतर्कतेमुळं चोरांचा प्रयत्न फसला, ही सर्व घटना cctv कॅमेरामध्ये कैद

गेल्या आठवड्यापासून पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या गावांमध्ये चोरांचा सुळसुळाट

पोलिसांनी रात्रीच्या वेळेस परिसरातील गस्त वाढवावी, स्थानिक नागरिकांची मागणी

Nashik News: नाशिकमध्ये 44 आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जातेय किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या

- नाशिक जिल्ह्यातील 44 आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या

- मुंडेगावच्या सेंट्रल किचनवर आमदार हिरामण खोसकर यांचा अचानक छापा

- आमदारांच्या पाहणीत धक्कादायक प्रकार आला समोर

- 18,000 विद्यार्थ्यांना दररोज दिला जातोय सडका भाजीपाला आणि कच्च्या पोळ्या

- आदिवासी विभागाच्या कारभाराचे आमदारांनी काढले वाभाडे

- नाशिकमध्ये पोषण आहाराचा फज्जा

- आमदार हिरामण खोसकर यांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

- मंत्रालयात बैठक घेऊन दोषींचे निलंबन करण्याची मागणी करणार, आमदार हिरामण खोसकर यांची माहिती

Mumbai News: शाळेमध्येच विद्यार्थिनीने केली आत्महत्या, गोरेगावमधील धक्कादायक घटना

अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

ओबेराय इंटरनॅशनल शाळेतील घटना

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे पोलीस ठाणे हद्दी परिसरातील घटना

गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुलीने शाळेच्या बाथरूम मध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या

बुटाच्या लेसच्या साह्याने गळ्याला दोर लावून मुलीने केली आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट ,पालकांची कोणतीही तक्रार नाही

याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात एडीआर दाखल

आरे पोलिस पुढील तपास करत आहेत

Maharashtra News: तुळजाभवानी विकास आराखडा मंजूरीसाठी पाठवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

तुळजाभवानी विकास आराखडा मंजूरीसाठी पाठवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

तुळजाभवानी मंदीर व परीसराच्या विकासासाठी जवळपास २ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला

तुळजाभवानी मंदीराच्या विकास आराखड्यात भाविक सुविधा केंद्र,दर्शन मंडप,पार्किंग,प्रवेशद्वारावर आकर्षण कमान,बाग बगिचे,दिव्यांगा करिता लिफ्ट यांचा समावेश

तर आधारवाडी परिसरात तुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा १०८ फुट उंच पुतळा व बगीचा साकारण्यात येणार

सध्या तुळजाभवानी मंदीर परिसरात जिर्णोद्धाराचे ६५ कोटी रुपयांची कामे ही मंदीराच्या स्व:निधीतुन आहेत सुरू

तुळजापूर तिर्थक्षेञ विकासासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार -

Nashik News: नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळून आल्यानं खळबळ

- नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळून आल्यानं खळबळ

- सर्कल दोन मधील बॅरेक क्रमांक आठ जवळ जमिनीत एका कर्मचाऱ्याला आढळून आला मोबाईल

- अज्ञाताने टॉयलेटच्या मागील बाजूला तंबाखुच्या पिशवीत गुंडाळून मोबाईल जमिनीत ठेवला होता पुरून

- कारागृहात मोबाईल कसा ? कोणी आणला? हे गुलदस्त्यात, मात्र कारागृहात मोबाईल येऊ शकतो हे स्पष्ट

- मोबाईल अज्ञात कैद्यानं लपवला की कारागृहातील कर्मचाऱ्यांनं शोध सुरु

- तुरुंगाधिकारी हिरालाल भामरे यांच्या फिर्यादीनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune News: पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली

पुणे - पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली

नववर्षाच्या सुरुवातीच्या सात दिवसांत पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या पाच लाखांवर गेली आहे.

मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामधून या सात दिवसांत ८५ लाखांवर मेट्रोचे उत्पन्न झाले आहे.

Kolhapur News: कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील जंगल परिसरात ३ वाघांचा वावर

कोल्हापूरच्या आजरा तालुक्याच्या जंगल परिसरात तीन वाघांचा वावर

आजरा - आंबोली परिसरातील चाळोबा जंगलात वाघांचा वावर

चाळोबा जंगलात जाण्यास स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना वन विभागाकडून प्रतिबंध

वाघांचा वावर असल्याने वनविभागाने रस्त्यावरील प्रवेशद्वार केले बंद

जंगलामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेशद्वारेही केले बंद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.