Stock Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची किंचित वाढीसह सुरुवात; बँक निफ्टी घसरला, आयटी शेअर्स चमकले
esakal January 11, 2025 06:45 AM

Stock Market Opening Latest Update 10 January 2025: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी (10 जानेवारी) शेअर बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 62 अंकांनी वाढून 77,682 वर उघडला. निफ्टी 25 अंकांनी वाढून 23,551 वर उघडला. बँक निफ्टी 77 अंकांनी घसरून 49,426 वर उघडला.

आयटी निर्देशांकात कमालीची वाढ झाली. निर्देशांकात अडीच टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. रियल्टी, ऑईल आणि गॅस निर्देशांकातही वाढ झाली. एफएमसीजी, पीएसयू बँक, ऑटोमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला.

टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. सर्वात मोठी घसरण इंडसइंड बँक, बीईएल, एनटीपीसी, टाटा कंझ्युमर, एसबीआयमध्ये झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.