Treat Dry Skin : हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी करा 'हे' घरगुती उपाय; त्वचा होईल तजेलदार
Idiva January 11, 2025 09:45 AM

हिवाळ्याने हळूहळू दार ठोठावायला सुरुवात केली आहे. या काळात थंड वाऱ्यांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी होते. यासोबतच हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोमेजून जाते. पण, यासाठीचे औषध तुमच्या घरात आधीच आहे. आज आपण काही उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमची कोरड्या त्वचेपासून सहज सुटका होईल आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.

हिवाळ्यात पेट्रोलियम जेली कशी वापरावी?

istock

कोरफड (aloe vera)

कोरफड त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. जर तुम्ही हिवाळ्यात कोरड्या त्वचेने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. त्वचा मऊ करण्यासबतच डाग दूर होण्यासही मदत होते.

ऐश्वर्या राय बच्चनचे सौंदर्य रहस्य; वयाच्या ५० व्या वर्षीही दिसते

istock 3

नारळाचे तेल (Coconut oil)

हिवाळ्याच्या हंगामात त्वचेला तडे जाण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे खोबरेल तेल. त्वचेची आर्द्रता सुधारण्यासोबतच ते मॉइश्चरायझर सारखेही काम करते.

हेही वाचा : HMPVच्या संसर्गापासून दूर कसे रहावे?

istock

पेट्रोलियम जेली (Petroleum jelly)

थंडीमध्ये कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेवर पेट्रोलियम जेली लावा. यामुळे त्वचा मुलायम होते.

हेही वाचा : Comfort Food : फूड लिस्ट जी तुमचा मूड ताजेतवाने करते आणि तुम्ही नेहमी आनंदी राहता

istock

हिवाळ्यात या गोष्टींपासून राहा दूर (Stay away from these things in winter)

हिवाळ्यात खूर गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या वाढते.

हिवाळ्यातही पिंपल्स येतात का? घ्या तेलकट त्वचेची काळजी, फॉलो करा टिप्स

istock

आंघोळीनंतर करा या गोष्टी (Do these things after shower)

थंड वातावरणात आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे. यामुळे त्वचा ओलसर राहते.

चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने फायदा होतो?

istock

पाणी (Water)

हिवाळ्यात लोक पाण्याचे कमी सेवन करतात. त्यामुळे त्वचेवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचेला आतून ओलावा मिळतो.

चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने फायदा होतो?

istock

हेही वाचा : चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका,या नैसर्गिक औषधी वनस्पती ठरतील प्रभावी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.