Mumbai Election News : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाराज नगरसेवकांचा ठाकरेंनी समाचार घेतलाय. ज्याला जायचं त्यानं जा अशा शब्दात ठारकरेंनी नाराजांना सुनावलंय....मातोश्रीवरील बैठकीत नेमकं काय झालं? आणि ठाकरेंनी नेमके कुणाला उद्देशून हा इशारा दिला पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट...
आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सूरू केलीय. ठाकरे गटाचे विधानसभा निवडणुकीत २० पैकी १० आमदार मुंबईतून निवडून आले. त्यामुळे ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत यश मिळण्याची आशा आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नगरसेवकांच्या बैठकांचा धडाका सुरू केलाय.
कारण मुंबईतले ठाकरे गटातील ३० पेक्षा जास्त माजी नगरसेवक यापूर्वीच शिंदे गटात दाखल झाले आहेत. आणि आणखी काही जण ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच की काय ठाकरेंनी या बैठकीत ज्याला जायचंय त्यांना जा अशा शब्दांत समाचार घेतला. ब्लॅकमेलिंग खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात....
'ज्याला जायचंय त्यांनी जा' , उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडेबोल सुनावले
काही माजी नगरसेवक-पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला ब्लॅकमेल केलं जातंय
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही
ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही
माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा
ठाकरे गटाच्या या सडेतोड भूमिकेचा शिंदे गटानं समाचार घेतलाय. त्यांच्या अशा वागण्यामुळे आमदार सोडून गेले आणि आता अनेक नगरसेवका आमच्या संपर्कात असल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय.
विधानसभेत अपयश आल्यामुळे ठाकरे गटाची मदार आता महापालिका निवडणुकांवर आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर महापालिकांच्याही निवडणुका आहेत. राज्यात ज्याचं सरकार त्याचेच वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाहतात असा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईसह इतर पालिकांमध्येही ठाकरे गटाला खिंडार पडणार का याकडे लक्ष लागलंय.