बीड जिल्ह्यातील केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वाल्मिक कराडचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. याचवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. तुम्ही फोटो काढता,आणि आम्हांला त्याची किंमत मोजावी लागते, त्यामुळे काळजी घ्या,असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.
Suresh Dhas : पंकजा मुंडेंच्या टीकेला धस यांनी दिले प्रत्युत्तरराज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील घटनेवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे आमदार सुरेश धस यांना टोला लगावला होता. त्यानंतर धाराशिव येथील मोर्चानंतर बोलताना धस यांनी पंकजा मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बीड नाही, तर परळीबाबत बोलतोय, असा पलटवार धस यांनी केला. बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम आम्ही काही केले नाही, आम्ही बीडबद्दल बोलत असून आम्ही फक्त परळी पॅटर्न बद्दल बोलतो. बीड जिल्हा आमचा शाबूत आहे, आमचं आमचं व्यवस्थित सुरू आहे. तुमच्या परळी पॅटर्नशी आमचा काही संबंध नाही, तो परळी पॅटर्न बदनाम होता. याची सुरुवात बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतून झाली आहे, सुरुवात 200 कोटींपासून झाली आहे, असा पलटवार धस यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे.
बिहार निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या हालचाली; नितीश कुमार मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या जनता दलाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.ते 15 जानेवारीच्यानंतर आपल्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता व्यक्त वर्तवली जात आहे.
Sanotsh Deshmukh Case : पुराव्याच्या आधारे कारवाई करण्यात येईल : फडणवीसमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करीत आहेत. जेवढे पुरावे आहेत. त्या सर्व पुराव्याच्या आधारावर कारवाई करण्यात येईल, या प्रकरणातून कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप,मंत्री बावनकुळे मोठा निर्णय घेणारमहाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या श्री शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त बरखास्त प्रकरणी लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. 1800 कर्मचाऱ्यांची भरती आणि विश्वस्त मंडळांवर होत असलेल्या गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी आणि ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.आता याप्रकरणी बावनकुळेंनीही लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
आयकर विभागाची मध्य प्रदेशमध्ये मोठी कारवाई, भाजपचा माजी आमदार निशाण्यावरमध्य प्रदेशमधील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार हरवंशसिंह राठोडांसह बीडी कन्स्ट्रक्शन व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्यावर आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. राठोड आणि केशरवानी यांच्या मालमत्तेवर धाडी छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाला छापेमारीत सापडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींमुळे आमदाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पाप झाकण्यासाठी पांघरून घेऊ नका : मनोज जरांगेधारशिवमधील आक्रोश मोर्चात धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना मनोज जरांगे पाटील यांनी, तुमची टोळी आता थांबवा. ही धमकी नसून फक्त आम्ही तुम्हाला सावध करत असल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर आम्ही बंदोबस्त करू. तुमच्या लोकांचे पाप झाकण्यासाठी पांघरून घेऊ नका, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil : एकदा आरक्षण मिळू दे, धनंजय मुंडेंचं सगळचं बाहेर काढतो : मनोज जरांगे-पाटीलधाराशिव जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. यावेळी जरांगे-पाटील यांनी, मुंडेंना धर्माचे काहीच नसून ते फक्त लुटन्याचे आणि मुडदे पाडण्याचे काम करत आहेत, असा हल्लाबोल केला आहे. तर एकदा समाजाला आरक्षण मिळू दे. मग परळीपासून सगळचं बाहेर काढतो असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री यांनी दगाफटका केला तर सरकारचा कार्यक्रम करू : मनोज जरांगे-पाटीलधाराशिव जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना 'न्याय द्या' अशा मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले. त्यांनी कुटुंबाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न्याय द्या. सगळ्या आरोपींना मोकाका लावा, त्यांच्यावर 302 लावा. जर न्याय दिला नाही, दगाफटाक केला तर आम्ही सरकारचा कार्यक्रम करू. मुख्यमंत्री यांनी दगाफटका दिला तर आम्ही खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असेही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
Suresh Dhas : 'आका म्हणतो माझा काही संबंध नाही, पण' : धसांचा हल्लाबोलबीड सरपंच हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना शनिवारी (ता.११) धाराशिव जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या अशा मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेत जोरदार टीका केली. तसेच त्यांनी आकाच्या आकाला जेलमध्ये टाका अशी मागणी केली. तर आकाचा आका म्हणतो, माझा काही संबंध नाही, पण खरा सुत्रधार तोच असल्याचा घणाघात केला आहे.
Beed Santosh Deshmukh Murder Case : बोकाला मकोका का नाही? : खासदार बजरंग सोनवणेबीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आठ आरोपीवर मकोका लावण्यात आला आहे. पण वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. यावरून आता नवा वाद उफाळला असून खासदार सोनवणे यांनी थेट सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी आठ आरोपींवर मकोका लावला, चांगली गोष्ट आहे असे म्हणत बोकाला मकोकातून बाहेर का काढले? असा सवाल उपस्थित केला आहे. तर हे पाप सरकार करत असेल तर ते चुकीचे असून एकीकडे आम्ही रोष व्यक्त करताना सरकार कराडला बाजुला करत असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
MLA Praveen Darekar : बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था ठाकरे गटाची – प्रवीण दरेकरमहाविकास आघाडीबरोबर न जाता स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणूका वेगळ्या लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली होती. यानंतर आता विविध प्रतिक्रीया येत आहेत. अशातच भाजप नेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी यावरून खोचक टीका केली आहे. राऊत यांनी केलेली घोषणा ही उशीरा सुचलेला शहाणपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर बैल गेला आणि झोपा केला अशा शब्दात त्यांनी राऊतांना डिवचले आहे.
Arif Naseem khan : राऊतांपाठोपाठ आता काँग्रेसचा स्वबळाचा नाराखासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणूका वेगळ्या लढण्याचे वक्तव्य केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीत उभी फुट पडल्याचे आता समोर आले असून आघाडी कधीही फुटू शकते. अशातच आता काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आरिफ वसीम खान यांनी थेट राऊत यांना फटकारले आहे. तसेच राऊत यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे, आम्ही स्वबळावर महानगरपालिकाच्या निवडणूक लढू, असे वक्तव्य केलं आहे.
Congress News : काँग्रेस पक्षही स्वबळाच्या मूडमध्ये; सतेज पाटलांचे पालिका निवडणुकीसंदर्भात मोठे विधानशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते सतेत पाटील यांनीही कॉंग्रेस हा मोठा पक्ष आहे, जिथं ताकद आहे, तिथं आम्हीही स्वबळावर लढू. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणून एकत्र असतानाही आम्ही अनेक महापालिका निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एकत्र बसून धोरण ठरवू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
Santosh Deshmukh Murder Case : विष्णू चाटेला पुन्हा पोलिस कोठडीसंतोष देशमुख खून प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची पोलिस कोठडी आज संपली होती. त्याला आज केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीची पुन्हा मागणी करण्यात आली होती. चाटेला पुन्हा 14 दिवस पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात यावे, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Narendra Modi Mumbai Tour : दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे करणार लोकार्पणपंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नौसेनेच्या ताफ्यात दोन युद्धनौका व एका पाणबुडीचा समावेश होणार आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नौसेनेकडून सुरत आणि निलगिरी या युद्धनौकांचे लोकार्पण केले जाणार आहे, तर वाघशिर या स्कॉर्पियन बनावटीच्या पाणबुडीचेही लोकार्पण या वेळी होणार आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी नौदलाकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
Vishalgad News Update : विशाळगडावरील ऊरुसाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलीविशाळगडावर उद्या होणाऱ्या ऊरुसाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली आहे. विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. विशाळगडावर हजरत पीर मलिक रेहान मीरासाहेब बाबांच्या नावाने दरवर्षी ऊरूस भरतो. मात्र, गेल्या वर्षी विशाळगडावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ऊरूसाला परवानगी नाकारली आहे.
विशाळगडावर होणाऱ्या ऊरूसाची परवानगी कोल्हापूर पोलिसांसह जिल्हा प्रशासनानं नाकारल्याची माहिती आहे. जोपर्यंत नियमानुसार अतिक्रमण संदर्भातली कारवाई पूर्ण होत नाही; तोपर्यंत गडावर कोणतेही सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. विशाळगडावर उद्या उरूस होणार होता, मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याची प्राथमिक माहिती आहे. या संदर्भात कोणताही शासकीय आदेश अध्याप निघालेला नाही. मंत्री नीतेश राणे यांनीही ऊरुसासंदर्भात शुक्रवारी सांगलीत वक्तव्य केलं होतं.
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खूनप्रकरण; सातही आरोपींवर मोकाबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मोका लावण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार देशमुख खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व सातही आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. सीआयडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Prashant Jagtap : ठाकरेंची स्वबळाची घोषणा ही सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना? : प्रशांत जगतापशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा घेतलेला निर्णय आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत, त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेना हा निर्णय घेतला आहे. ठाकरेंची ही भूमिका सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्याची तर नाही ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जरी स्वतंत्र लढणार असला तरी आम्ही समविचारी पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीच आगामी निवडणुका लढवणार आहोत, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.
भाजपनं बाळा भेगडेंना आपल्या पदरात घ्यावं : सुनील शेळकेविधानसभा निवडणुकीत मावळचे भारतीय जनता पक्षाचे नेते बाळा भेगडे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात काम केले होते. बाळा भेगडेंचे प्रकरण शिस्तभंग समितीकडे जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यावर सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं बाळा भेगडेंना माफ करून आपल्या पदरात घ्यावं आणि त्यांना पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन शेळकेंनी केले आहे.
Santosh Deshmukh Murder Live News : सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चासंतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येने जिल्ह्यासह राज्य हादरून गेले. देशमुख यांची हत्या होऊन एक महिना उलटून गेला. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी शनिवारी (ता.11 जानेवारी) धाराशिवमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे.
Ram Mandir Pran Pratishtha Anniversary Time Table : आज पासून अयोध्येत साजरा होतोय प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा वेळापत्रक १. यज्ञ मंडप (मंदिर परिसर):शुक्ल यजुर्वेदातील मंत्रांसह अग्निहोत्र (सकाळी ८-११ आणि दुपारी २-५)
६ लाख श्रीराम मंत्रांचा जप करा
राम रक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा इत्यादींचे पठण.
२. मंदिराच्या तळमजल्यावरील कार्यक्रम:राग सेवा (दुपारी ३-५)
बधाई गान (सायंकाळी ६-९)
3 प्रवासी सुविधा केंद्राच्या पहिल्या मजल्यावर:संगीतमय मानसिक वाचन
4 अंगद टेकडी:राम कथा (दुपारी २-३:३०)
मानस प्रवचन (दुपारी ३:३०-५)
सांस्कृतिक कार्यक्रम (सायंकाळी ५:३०-७:३०)
प्रसाद वाटप (सकाळपासून)
Ram Mandir Pran Pratishtha Anniversary : अयोध्येत साजरा होतोय प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा11 जानेवारी 2025 या दिवशी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेचा पहिला वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भारतातील अनेक मोठे संत उपस्थित राहणार आहेत. प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा ११ जानेवारीपासून सुरू होईल आणि १३ जानेवारीपर्यंत चालेल. रामलल्लाच्या अभिषेकाने या समारंभाची सुरुवात होणार आहे. दुपारी १२:२० वाजता रामलल्लाची महाआरती करण्यात येईल.
PM Modi to attend AI Action Summit in France on February PM Modi to attend AI Action Summit in France : पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये फ्रान्स दौऱ्यावर; AI समिटमध्ये होणार सहभागीपंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 11 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अॅक्शन समिटमध्ये सहभागी होणार आहेत. ही युरोपीय राष्ट्राची महत्त्वाची भेट असेल, अशी घोषणा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी केली.
Arvind Kejriwal Live Update : आज 12 वाजता अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद, दिल्लीतील लोकांसाठी आणखी एक मोठी घोषणा करणार?दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आणि सर्वच पक्ष निवडणूक प्रचाराला लागले आहेत. यातच आप नेते अरविंद केजरीवाल यांनी मागील काही दिवसात दिल्लीतील जनतेसाठी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज 12 वाजता देखील केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संजय राऊत यांचं मोठं विधानशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. संजय राऊत म्हणाले, "नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो".
Santosh Deshmukh Murder Case : तपासाची माहिती मिळत नाही, मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवींची खंतसंतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपास नेमका कोणत्या दिशेनं चालला आहे, याची माहिती मिळत नसल्याची खंत मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी यांनी व्यक्त केली. 'या हत्येप्रकरणी नेमकं काय चाललं आहे. तपास कुठपर्यंत आला आहे, हे कळालं पाहिजे', अशी मागणी वैभवी देशमुख हिनं सरकारकडे केली आहे.
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येचा खटला इतर जिल्ह्यात चालवा; आमदार कैलास पाटील यांची मागणीबीड, परभणी घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला हवा. संतोष देशमुख प्रकरणाचा खटला इतर जिल्ह्यात चालवा, तसेच आरोपीच्या सबंधित अधिकाऱ्यांना एसआयटीतून वगळण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ धाराशिव इथं आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.
Washim Muk Morcha : संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चाबीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व त्यांचा मुलगा विराज देशमुख सहभागी होणार आहे.
Torres Company : ख्रिसमसच्या बहाण्यानं टोरेसचा संस्थापक देशाबाहेर पसारटोरेसच्या मुख्य संस्थापकांपैकी एक ओलेना स्टोएना ही युक्रेनी महिला आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली असून, तिचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच संस्थापक व्हिक्टोरिया कोवालेंकोसह अन्य पदाधिकारी ख्रिसमसचा बहाणा करत डिसेंबरअखेरीस देशाबाहेर पसार झाल्याचे चौकशीत समोर येत आहे. टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी सुरू असून आतापर्यंत तीन हजारांच्या आसपास खडे आणि पाच कोटी रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
Jaydeep Apte : अखेर जयदीप आपटेला जामीन मंजूरमागील वर्षी ऑगस्ट महिन्यात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुर्णाकृती पुतळ्याच अनावरण झालं होतं. मात्र, अवघ्या आठ महिन्यात तो पुतळा कोसळला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतपर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला काही पोलिसांनी अटक केली होती. तर याच आपटेचा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Dharashiva Live News : धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशिची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. आज हा मोर्चा धाराशिवमध्ये काढण्यात येणार आहे.
HMPV Viras : HMPV ची लागण झालेले देशात 11 रुग्ण आढळलेचीन मध्ये थैमान घातलेल्या HMPV विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. तर या विषाणूची लागण झालेले देशात 11 आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गुजरातमधील ८ वर्षाच्या मुलाला तर उत्तर प्रदेशमधील साठ वर्षाच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.