Maharashtra Political News Live : भाजपचं मिशन 'खेड्याकडे चला'! बावनकुळेंच्या सर्व मंत्र्यांना महत्वाच्या सूचना
Sarkarnama January 13, 2025 02:45 AM
Amit Shah in Shirdi : ओअमित शाह यांचे अधिवेशन स्थळी आगमन

भाजपच्या शिर्डीतील महाविजय अधिवेशनाला भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आगमन झाले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सभापती राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.

Nandgaon MIDC Poisoning : कामगारांना विषबाधा

अमरावतीतील नांदगाव एमआयडीसीतील कामगारांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. पाणी आणि अन्नातून विषबाधा झाल्याचे समजते. गोल्डन फायबर कंपनीतील सुमारे 100 हून अधिक कामगारांना उलट्यांचा त्रास होत आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याची प्राथमिक माहिती आहे.

Minister Chandrashekhar Bawankule : मंत्र्यांना खेड्यात जाण्याच्या सूचना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यांतील भाजपच्या सर्व मंत्र्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. दर 15 दिवसांनी प्रत्येक मंत्र्यांनी खेड्यात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांकडून अपघातग्रस्तांना मदत

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ज्योतिबा रस्त्यावर अपघातग्रस्तांना मदत केली. ज्योतिबा रस्त्यावरील घाटात चार चाकीला अपघात झाला होता. याच मार्गाने ज्योतिबाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातस्थळी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी परभणीत घेतली सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. खासदार सुळे या परभणीत दाखल झाल्या असून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

Ajit Pawar : संतोष देशमुख खूनप्रकरणी दोषींवार कडक कारवाई होईल

कितीदा तेच तेच सांगायाचे. संतोष देशमुख खूनप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही आतापर्यंत ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले. पण तुम्ही त्यांना पाठीशी घालता, असा आरोप होत आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. तुझी चौकशी कधी होईल. तुझं नाव आल्यावरच ना असा सवाल अजितदादांनी केला.

Amit Shah : अमित शाह घेणार शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्ताने अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत आहे. शिर्डीला जाण्यापूर्वी अमित शाह हे शनिशिंगणापूरला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांचा नियोजित दुपारी साडेचारचा दौरा अलीकडे आला आहे. अमित शाह हे आता दुपारी शनि शिंगणापूरमध्ये दाखल होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्यामुळे शनिशिंगणापूरमध्ये कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अमित शाह हे शनि देवाच्या दर्शनासाठी येणार आहेत, काही वेळ भाविकासांठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

Amit Shah Shirdi Tour : श्रीरामपूरहून शिर्डीकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी येथे येणार आहेत. मात्र शाह यांच्या विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या अमित शाह यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. श्रीरामपूर येथील कार्यकर्ते शिर्डीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. रिपब्लिकन पक्षाचे दीपक त्रिभुवन यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या वेळी कार्यकर्ते आणि पेालिसांमध्ये झटापट झाली.

Shirdi BJP Convention : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप अधिवेशनासाठी दाखल

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शिर्डीतील महाविजय अधिवेशन स्थळी दाखल झाले आहेत. येताच नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात व्यासपीठावर संवाद रंगला होता.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडलाही पाठवली नोटीस

संतोष देशमुख खूनप्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी ठळकपणे पुढे आली होती. एकट्या बीडमध्ये सुमारे साडेबाराशेच्या आसपास शस्त्र परवाना असल्याचे उघड झाले होते. त्यावरून बीडच्या जिल्हा प्रशासनावर टीका झाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या बीड जिल्हा प्रशासनाने शस्त्र परवाना रद्द प्रकरणी मोठे पाऊल उचले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी 100 जणांना नोटीस पाठविली आहे. संबंधितांना तत्काळ शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते, परवाना निलंबित झाल्यानंतरही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. वाल्मिक कराडलही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, तो सीआयडी कोठडीत असल्याने त्याला पोचली नाही. कोठडीबाहेर आल्यानंतर ती वाल्मिक कराडला देण्यात येणार आहे.

Suresh Dhas : मला व्यक्तिगत पोलिस संरक्षणाची गरज भासत नाही; आमदार सुरेश धस

शरद पवार यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावर आमदार सुरेश धस म्हणाले, "मला व्यक्तिगत पोलिस संरक्षणाची गरज भासत नाही. जनता हेच माझ सर्वस्व. आमचं बरवाईट करायचं असेल, तर कोणी कुठल्या पद्धतीने ही करू शकत. अंजली दमानिया यांनी कुणाच्याही फोनला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा फोन येईल त्यांच्याबाबत तक्रार दाखल करा".

Beed Sarpanch Death Case : सरपंच क्षीरसागर यांचा मृत्यू घातपात की, अपघात याचा शोध अजून लागायचा; धस

परळीच्या सौंदाना गावातील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्याबरोबर काल रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे, याचा करिश्मा बघा. रात्री झालेली घटना घातपात की, अपघात याचा शोध अजून लागायचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टीप्पर बंद नाहीत. या अवैद्य व्यवसायांना परळीचे पोलिस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहे.

Suresh Dhas : आमचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा

भाजपच्या अधिवेशनाअगोदर आमदार सुरेश धस यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मी नेहमी साईबाबांच्या दर्शनाला येत असतो. माझ्या मतदारसंघातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना साईबाबांना केली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आष्टी विभागाला पाणी दिला असून पाटोदा शिरूरला लवकरात लवकर पाणी द्यावं आणि आमचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली.

Murlidhar Mohol : सदस्य नोंदणी कक्षाला दिली भेट

शिर्डी अधिवेशनस्थळी भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ दाखल झाले आहेत. त्यांनी सदस्य नोंदणीसाठी असलेल्या कक्षाला भेट दिली.

कार्यकर्त्यांनी सेल्फीसाठी घातला गराडा

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत. त्यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून देखील डावलण्यात आले आहे. ते नाराज असल्याची चर्चा असतानाच, ते शिर्डी अधिवेशनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी सेल्फी घेण्यासाठी गराडा घातला.

Shivsena News : 'रामदास कदमांच्या टीकेला ठाकरे गटाच्या शरद कोळींचे प्रत्युत्तर

तुमच्या टाळूची सगळी केसं गेली तरी तुम्हाला अजून अक्कलदाढ आली नाही का? रामदास कदम उद्धव साहेबांवर अरेरावीची भाषा करताय, तुम्हाला दात आलेत का? असे रामदास कदमांच्या टीकेला ठाकरे गटाच्या शरद कोळींने प्रत्युत्तर दिले.

Nagpur News : नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास सुरूवात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास नागपुरात आज (ता.१२) सुरूवात झाली. यशवंत स्टेडियम येथे या महोत्सवाचे अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आजपासून 2 फेब्रुवारी पर्यंत हा क्रीडा महोत्सवास होणार असून यात जवळपास 80 हजार खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut : मुख्य आका आपल्या जवळ ठेवायचा अन् खालच्या लोकांवर कारवाई केली जातेय : संजय राऊत

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री वारंवार म्हणतात मी कोणाला सोडणार नाही. पण त्यांनी मुख्य आरोपीच मोका कायद्यातून बाहेर सोडला. अशीच राज्य करण्याची भाजपची पद्धत आहे. मुख्य आका आपल्या जवळ ठेवायचा आणि त्याच्या खालच्या लोकांवर कारवाई करायची.

Sanjay Raut : सरकार वाल्मिक कराड वाचवण्याचे काम करतयं? : संजय राऊत

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात काही लोकांवर मोका लावण्यात आला पण वाल्मिक कराड याच्यावर मोका लावण्यात आला नाही. यावरून आता वाद उफाळला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून ते आपल्या वाक्याप्रमाणे वागत नसल्याचे म्हटले आहे. तसेच ते वाल्मिक कराड याला वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.

Sanjay Raut : आघाडी तुटली असे मी म्हणालो नाही : संजय राऊत

इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी म्हणालो नाही. काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमुळे पक्ष मजबूत होतो. यामुळे स्वबळाचा नारा देण्याची पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती.

BJP Adhiveshan Shirdi : आम्ही जनतेची सेवा करू : भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

भाजपचे नवनियुक्त महाराष्ट्र कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, यांनी आपल्या नियुक्तीवरून प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी, कालच माझी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. कालच मी साईबाबांचे दर्शनही घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेची सेवा करू. आपण सर्वजण समन्वयाने एकत्र काम करू. वरिष्ठ नेतृत्वाने आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन.

Elections to Self-Governing Bodies : CM देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले

स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकांसाठी तयार राहा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले. विधानसभेच्या निवडणुकांचे युद्ध जिंकलं असलं, तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. तसेच त्यांनी, भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांना कानमंत्र दिला.

BJP : भाजप संघटनात्मक बांधणीसाठी 'भाकरी' फिरवणार; भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना पक्षात बढती

महापालिका निवडणुकानंतर भाजप संघटनात्मक बांधणीसाठी 'भाकरी' फिरवणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. याचवेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना पक्षात बढती देण्यात आली आहे. चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Chandrashekhar Bawankule : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Chennai Express : सोलापुरात मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक

सोलापूरमध्ये मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत ट्रेनच्या काचा फुटल्या असून एक प्रवासी जखमी झाला आहे. ही दगडफेक पारेवाडी - वाशिंबे दरम्यान करण्यात आली आहे. धावत्या रेल्वेववर दगडफेक करण्याची ही १० दिवसांतली दुसरी घटना असल्याने आता आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाची तयारी

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अद्यापही एका आरोपीची अटक झालेली नाही. या प्रकरणात तपास यंत्रणांना यश आलेले नाही. त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज (ता.12) याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान याआधी देखील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Beed Accident : राखेची वाहतूक करणाऱ्याने सरपंचाला उडवले

बीडसह राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने संताप व्यक्त केला जात असतानाच सौंदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला आहे. तर राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांना उडवल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव अभिमन्यू क्षीरसागर असे असून मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला

Ajit Pawar's NCP : उद्धव ठाकरेंप्रमाणेच महायुतीतील एका पक्षाचा स्वबळाचा नारा? बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आता स्वबळाचे वारे महायुतीत देखील वाहताना दिसत आहेत. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत पक्षातील जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी तसे वक्तव्य केलं आहे.

BJP Convention Shirdi: जे. पी. नड्डा व फडणवीसांच्या उपस्थितीत उद्धघाटन

भाजपच्या शिर्डीतील महाविजय अधिवेशनाला आज सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत आहे, या अधिवेशनाची ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन आहे. फडणवीसांची अजोड कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या महाविजय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यानिमित्ताने साईंची शिर्डी गजबजून गेली आहे. शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता अधिवेशनाचे उद्धघाटन होणार आहे.

vijay kumar special police commissioner:दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तपदी विजय कुमार यांची नियुक्ती

जम्मू-काश्मीरचे आतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांची दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय कुमार यांनी अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय कुमार यांच्या नियुक्ती महत्वाची मानली जाते.

Santosh Deshmukh Murder Investigation: वाल्मिक कराड याला मोक्कातून वगळल्याने देशमुख कुटुंबियांनी नाराजी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. यातील सर्व आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबधीत असलेल्या वाल्मिक कराड याला मोक्का लावण्यात आलेला नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबीयांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडला मोका आणि ३०२ लावण्याची मागणी केली आहे.

BJP Convention Shirdi Live: राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अधिवेशनाची जबाबदारी

भाजपचे महाअधिवेशन आज शिर्डीत होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील दिग्गज नेते तसेच मंत्री व आमदार अधिवेशनानिमित्त शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. भाजपचे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजनाची जबाबदारी स्वीकारली असल्यामुळे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील गेल्या काही दिवसापासून अधिवेशनाची जय्यत तयारी करीत आहेत. अधिवेशनासाठी 15 हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमून या ठिकाणी विचारांचे मंथन करणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.