Thackeray group strongly criticizes Congress msj
Marathi January 13, 2025 03:24 PM


लोकसभेत काँगेसचे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि मोदी यांच्या हुकूमशाही तसेच भ्रष्टाचाराच्या किल्ल्यावर ते जोरदार प्रहार करीत आहेत. संसदेत एक असलेला विरोधी पक्ष बाहेर मात्र वेगवेगळ्या मार्गांनी जातो, यावर ठाकरे गटाने नेमकेपणाने बोट ठेवले आहे.

(Thackeray about INDIA) मुंबई : पंजाब तसेच दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकमेकांविरुद्ध उभे आहेत. केरळात काँग्रेस आणि डाव्यांची लढाई आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरुद्ध काँग्रेसचा सामना चालूच राहणार आहे आणि त्यास पर्याय नाही. कारण प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपापली भूमिका, कार्यकर्ते तसेच अस्तित्व टिकवायचेच आहे आणि काँग्रेस पक्ष हेच समजून घ्यायला तयार नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. (Thackeray group strongly criticizes Congress)

काँग्रेस अनेक राज्यांत स्वबळावर लढू शकत नाही. तेवढे लढण्याचे बळ नाही, पण प्रादेशिक पक्षाच्या ताटातील वाटीत बोटे घालणेही सोडत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात त्याचा परिणाम पाहायला मिळाला, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला मित्रपक्ष काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Thackeray about Omar Abdullah : ज्युनियर अब्दुल्लांचे सूर बदलले, ठाकरे गटाचा घणाघात

एक सत्य स्वीकारायला हवे ते म्हणजे भाजपाच्या गुहेत शिरलेल्या मित्रपक्षांचा सुपडा साफ झाला. त्या वृत्तीने काँग्रेसने वागता कामा नये. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राहील. त्याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने काँग्रेससह सगळ्याच भाजपा विरोधकांत नवी ऊर्जा निर्माण केली. आता प्रियंका गांधीही आल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे अनुभवी नेते आहेत, पण इंडिया आघाडीत जो विस्कळीतपणा निर्माण झाला आहे तो सावरण्याची जबाबदारी कोणी घ्यायची? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

– Advertisement –

लोकसभेत काँगेसचे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि मोदी यांच्या हुकूमशाही तसेच भ्रष्टाचाराच्या किल्ल्यावर ते जोरदार प्रहार करीत आहेत. संसदेत एक असलेला विरोधी पक्ष बाहेर मात्र वेगवेगळ्या मार्गांनी जातो, यावर ठाकरे गटाने नेमकेपणाने बोट ठेवले आहे.

आज इंडिया आघाडीत असलेले काही पक्ष कधीकाळी ‘एनडीए’ म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेही सदस्य होते. त्या आघाडीचा (तेव्हाच्या) अनुभव काय सांगतो? सत्ता असो अगर नसो, राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला की, दिल्लीत ‘एनडीए’ची बैठक बोलावली जात असे. अनेकदा प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी हे नेते त्या त्या राज्यात जाऊन तेथील पक्षप्रमुखांशी चर्चा करीत. ‘एनडीए’स एक भक्कम निमंत्रकदेखील होता. बराच काळ या पदावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा ज्येष्ठ नेता होता आणि सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांशी हे निमंत्रक संवाद ठेवत चर्चा करत, बैठकांना सन्मानाने बोलवत. या बैठकांचे अध्यक्षस्थान कधी अटल बिहारी वाजपेयी, तर कधी लालकृष्ण आडवाणी स्वीकारीत. शिवाय अधूनमधून कधी चहापान, तर कधी जेवणावळी पार पडत. त्यामुळे त्या आघाडीतील नाते वरवरचे नव्हते, तर घरोब्याचे निर्माण झाले हे मान्य करावेच लागेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Thackeray about INDIA: Thackeray group strongly criticizes Congress)

हेही वाचा – Baba Siddique Murder : सिद्दिकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड आला समोर…या सोशल मीडिया ऍपचा घेतला आधार



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.