आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी एकूण 8 संघ भिडणार आहे. या स्पर्धेसाठी आठही संघांनी तयारी केली आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या संघ निवडीची अजूनही घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, इतर संघ आपले खेळाडू घोषित करून मोकळे झाले आहेत. तर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी अजूनही खलबतं सुरु आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. दुबईमधील खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. दरम्यान भारत प्रतिस्पर्धी नसलेले इतर सर्व सामने पाकिस्तानात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील 8 संघांचे चार-चार असे दोन गट पाडले आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. अ गटात बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे, तर ब गटात अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना कराची येथे 19 फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने आपले संघ जाहीर केले आहेत. दुखापतग्रस्त असलेला पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाचं नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, टेम्बा बावुमाकडे दक्षिण अफ्रिकेची धुरा असणार आहे.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रास व्हॅन डर ड्यूसेन.
बांग्लादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, एमडी महमूद उल्ला, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ होसाई इमोन, नसुम अहमद, तन्झीम अहमद हसन साकिब, नाहिद राणा.
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरन, रहमानउल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक, नावेद झदरान.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.