भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी का खाल्ली जाते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे…
GH News January 14, 2025 01:09 AM

भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस. या दिवशी महाराष्ट्रात बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि बऱ्याच भाज्या घालून केली जाणारी लेकुरवाळी भाजी करण्याची पद्धत आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी मुगाची खिचडी देखील केली जाते. हिंदूधर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यासोबतच पोषक आहाराच्या दृष्टीने प्रत्येक सणाची एक विशेष महत्त्व असते. सणाच्या दिवशी पदार्थ करण्याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहे. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

शरीराला आवश्य असलेले घटकांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही निरोगी राहाचा. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरीचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रोटीन्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहातं. बाजरीच्या भकरीचं सेवन केल्यास तुमच्यया शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. तु्म्हाला जर लठ्ठपणा सारख्या समस्या असतील तर तुम्ही बाजरीच्या भाकरीचे सेवन करू शकता.

बाजरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

केसांसाठी फायदेशीर – बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात बायोटीन आणि रायबोफ्लाविन आढळतात ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. बाजरीचे सेवन केल्यास तुम्हाला केसगळती सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. बाजरीचे सेवन केल्यामुळे तुमच्या केसांवर चमक येण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर – थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत समस्या होऊ शकतात. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता यांच्या सारख्या समस्या होतात. अशा परिस्थितीमध्ये बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि लॅक्टिक ऍसिड असते ज्यामुळे पोटदुखी सारख्या समस्या होत नाहीत. बाजरीमधील प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य निरोगी राहाण्याास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, खनिजे, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आहार होत नाही.

मधुमेह दूर होते – बाजरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बाजरीच्या भाकरीचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरतात.

हाडांचे आरोग्य – हिवाळ्यात योग्य प्रमाणात बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोषक घटकांचा समावेश होतो. बाजरीच्या सेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासत नाही ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर तु्मही बाजरीच्या भाकरीचे सेवन करू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.