आयपीओ गुंतवणूकदार मालामाल, पहिल्याच दिवशी मिळाला दुप्पट नफा
ET Marathi January 14, 2025 05:45 PM
मुंबई : अवॅक्स अ‍ॅपेरेल्स अँड ऑर्नामेंट्स (Aavax Apparels & Ornaments) च्या शेअर्सने मंगळवार १४ जानेवारी रोजी शेअर बाजारात दमदार प्रवेश केला. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर ९० टक्के प्रीमियमवर म्हणजे १३३ रुपयांवर सूचीबद्ध झाले. अवॅक्स अ‍ॅपेरेल्स अँड ऑर्नामेंट्सच्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत ७० रुपये हाेती. आयपीओ गुंतवणूकदारांनी लिस्टिंगवर ९० टक्के इतका मोठा नफा कमावला आहे. लिस्टिंगनंतरही शेअर्स आणखी ५ टक्के वाढला आणि अप्पर सर्किटला धडकला. यासह गुंतवणूकदारांचा नफा जवळपास दुप्पट ९९.५० टक्क्यांपर्यंत वाढला. कंपनीचे मार्केट कॅप १४.५१ कोटी रुपयांपर्यंत वाढले. २६०.४२ पट सबस्क्रिप्शनअवॅक्स अ‍ॅपेरेल्स अँड ऑर्नामेंट्सचा आयपीओ ७ ते ९ जानेवारी दरम्यान बोलीसाठी खुला होता. आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. शेवटच्या दिवसापर्यंत हा आयपीओ २६०.४२ पट जास्त सबस्क्रिप्शनसह बंद झाला. कंपनीला किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ३७२.३५ पट जास्त बोली मिळाल्या. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांची (NII) श्रेणी १४०.४६ पट भरली. १.९२ कोटी उभारलेअवॅक्स अ‍ॅपेरेल्स अँड ऑर्नामेंट्सने आयपीओद्वारे एकूण १.९२ कोटी रुपये उभारले आहेत. हा आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सचा होता. कंपनीने म्हटले की आयपीओद्वारे उभारलेला निधी कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. कंपनीबद्दल२००५ मध्ये सुरू झालेली ही कंपनी २ वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये व्यवसाय करते. पहिला व्यवसाय घाऊक व्यापाराचा आहे. दुसरा व्यवसाय म्हणजे चांदीच्या दागिन्यांची ऑनलाइन किरकोळ विक्री. ही कंपनी विणलेल्या कापडाचा घाऊक व्यापार करते आणि चांदीचे दागिने ऑनलाइन विकते. यामध्ये अंगठ्या, महिलांचे अँकलेट, पुरुषांचे कडा, प्लेट सेट, चष्मा, बांगड्या, वाट्या, साखळ्या आणि इतर दागिने समाविष्ट आहेत. कंपनी देशभरातील सर्व प्रमुख शहरांना वस्तूंचा पुरवठा करते.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.