बीड : सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी राज्यात ठिक-ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्च्यातून संतोष देशमुखांच्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी नेते आणि कुटुंबीयांकडून केली जात आहे. पण, या मोर्चातून एका जातीला लक्ष्य केले जात असल्याचा दावा करत ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांच्याकडूनही मोर्चे काढण्यात येत आहेत. पण, या मोर्चानंतर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन असल्याचा आरोप ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांनी केला आहे. याला जरांगे-पाटील यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे.
झालं असं की, सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक अधिकाऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. मात्र, एकाच जातीला टार्गेट गेले जात असल्याचा आक्षेप लक्ष्मण हाके यांनी घेतला. मात्र, हाके संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचं समर्थन करण्यासाठी हाकेंकडून प्रतिमोर्चे काढत असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात आलं. यातच आता जरांगे-पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
– Advertisement –
देवेंद्र फडणवीसांनी दखल घ्यावी…
– Advertisement –
“जीवे मारण्याच्या धमक्या नित्याच्याच झाल्या आहेत. मी कुठेही आरोपींचं समर्थन केले नाही. एका जातीला तुम्ही आरोपी ठरवू नका, शिक्षकांचा काय संबंध? असं मी बोलल्यानंतर रोज मला जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल केले जात आहे. माझ्या कारला कट मारला जातो. कारच्या आडवे लोक येतात. एखाद्या हॉटेलमध्ये मी चहा प्यायला बसल्यावर तिथे माणसे गोळा होतात. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना लोक, असं बोलत असतील, तर याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी,” अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.
जा तिडके म्हणावे…
याबद्दल जरांगे-पाटील यांना एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी झिडगारून लावलं आहे. जरांगे-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप हाकेंनी केलाय असं विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “जा तिकडे म्हणाव… भिकार सा******” एवढीच प्रतिक्रिया जरांगे-पाटील यांनी दिली आहे.
हाके आणि जरांगे-पाटलांच्या कार्यकर्त्यामध्ये फोनवरून काय संवाद?
कार्यकर्ता : नुसतंच तू मराठ्यांना आणि जरांगेंना बोलत आहे…
हाके : जरांगेंनी पण स्वत:चं घर-दार बघावे…
कार्यकर्ता : शिव्या दिल्या…
हाके : तू शिव्या देतो का?
कार्यकर्ता : शिव्या खायची तुझी लायकी नाही…
हाके : मग माझी लायकी काय? मी आहे मेंढपाळाचा मुलगा, माझी लायकी नाही…
हेही वाचा : सगळं पाप झाकण्यासाठी मुंडे ओबीसींचं पांघरून घेतायत; मनोज जरांगेंचा हल्लाबोल