Children And Heart Attack : लहान मुलांमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचे प्रमाण
Marathi January 14, 2025 06:24 PM

दिवसेंदिवस हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत असून आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी चितेंची बाब बनत चालली आहे. पूर्वी वयोवृद्धांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसायचे. पण, बदलती लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यासह अनेक कारणांमुळे या आजाराचे प्रमाण आता लहान मुलांमध्ये वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी एका 6 वर्षाच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकने मृत्यु झाल्याची घटना घडली होती. शाळकरी मुलांमध्ये या गंभीर आजाराचे वाढते प्रमाण पाहता पालकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. त्यामुळे जाणून घेऊयात, लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्याची सामान्य कारणे आणि कशी काळजी घ्यावी.

  • लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक वाढण्याचे सामान्य कारण बदलती लाइफस्टाइल ठरत आहे. मुलांचा दिवस घड्याळ्याच्या काट्यावर सुरू होत आहे. शाळा, क्लासेस, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी यामध्ये मुलांना स्वत:साठी वेळ काढता येत नाही. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून आरोग्याच्या तक्रारी सुरू होत आहेत.
  • या लाइफस्टाइलमध्ये आणखी एक कारण ठरत आहे ते म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाइलचा अतिरिक्त वापर होणे.
  • मुले मोबाइलवर तासनतास खेळत असल्याने एकाच जागी बसून राहत आहेत. यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणे यासारख्या समस्या लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसत आहेत. या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे.
  • तासन तास एकाज जागी बसून राहिल्याने हार्मोनल संतूलन बिघडत आहे. ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहेत.
  • लहान मुलांसह पालकही फास्ट फूड खातात. फास्ट फूड, जंक फूड, प्रोसेस्ड फूड खाल्याने शरीराच्या व्याधी वाढत आहेत. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट, साखर, मीठ जास्त असते. ज्यामुळे हृदयाच्या धमन्या वाढतात आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

पालकांनी काय काळजी घ्यायला हवी-

  • मुलांना ताणतणावापासून दूर ठेवावे.
  • मुलांना शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह ठेवावे.
  • अभ्यासाव्यतिरीक्त मुलांना खेळण्यासही प्रवृत्त करावे.
  • मुलांच्या आहारावर लक्ष ठेवावे. जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला देऊ नये, या व्यतिरीक्त जास्तीत जास्त पोषणयुक्त आहार मुलांना द्यावा.
  • मुलांना कोणताही आजार असेल तर त्वरीत डॉक्टरांशी चर्चा करून औषध उपचार सुरू करावेत.

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.