राणेंनी दिलेल्या धमकीला न घाबरता चिपी विमानतळावर येत्या 15 दिवसात विमान वाहतूक सुरु न झाल्यास शिवसेना तारीख जाहीर करून विमानतळाला टाळे ठोकणारच असा प्रति इशारा नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी वैभव नाईक यांना टाळ ठोकून दाखवाच तुमच्या घराला टाळ ठोकीन असा इशारा दिला होता या इशाऱ्यावर बोलताना वैभव नाईक यांनी मी असल्या धमक्यांना भीक घालत नाही. विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टीना विरोध करत राहणार. शिवसेना लवकरच तारीख जाहीर करेल आणि टाळ ठोकण्याचा कार्यक्रम करेल. त्यापूर्वी मुंबईची विमान वाहतूक सुरू करा असा इशाराच वैभव नाईक यांनी दिला आहे
Maharashtra Live Update : धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जणांचे आंदोलन, गावकरी आक्रमक, धनंजय देशमुख त्यांचे साडू दादा खिंडकर व अन्य एक जन पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. गावकरी आक्रमक झाले आहेत. वाल्याला फाशी झालीच पाहिजे, आशा घोषणा गावकऱ्यांनी दिल्या आहेत. Maharashtra Live Update : धनंजय देशमुखांचे शोले स्टाइल आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढले, जरांगेंकडून मनवण्याचा प्रयत्न धनंजय देशमुख गावातून बाहेर ? गावात नसल्याची सूत्रांची माहिती. आंदोलनासाठी बाहेर गेल्याची चर्चा Maharashtra Live Update : लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोनलक्ष्मण हाके यांना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी धमकी
लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन
जरांगे यांच्या समर्थकांकडून फोन वरून धमकी
हाकेंच्या पत्रकार परिषद पुर्वी फोनहून अरेरावी
Maharashtra Live Update :काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश- उमरेड विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश
- उमरेड विधानसभा क्षेत्रातील दोन्ही पंचायत समिती क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश
- पंचायत समिती सभापती, उपसभापती सह असंख्य कार्यकर्त्याचा भाजप पक्ष प्रवेश..
- आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत या पक्षप्रवेशामुळे होणार भाजपला होणार फायदा..
- काँग्रेसमध्ये आता नेतृत्व राहिला नाही आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर भाजपच विकास करु शकतो. म्हणुन पक्ष प्रवेश झाल्याच माजी आमदार राजु पारवे यानी सांगितलं...
आनंदराजे आंबेडकरांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटआनंदराज आंबेडकर यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या पत्नीसह आईची भेट
आईसह पत्नीशी साधला संवाद
तपासा विषयी केली विचारपूस
आम्ही आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहोत दिला शब्द..
Akola: अकोल्यात नायलॉन मांजामूळे महिलेचा पाय तर तरुणाचा कापला गळा..अकोल्यात चायना मांज्याने ऐका महिलेचा पाय कापलाय.. जवळपास महिलेच्या पायाला 45 टाके लागले आहेये.. अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे ही घटना घडली आहेये.. कलावती मराठे नामक महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाली आहे.. या महिलेचा मांज्याने इतका पाय चिरला गेला आहे की तिच्या पायाला 45 टाके पडले आहेत....
सांगलीच्या पद्मावती मंदिरातील चोरीचा छडा; चोरट्यास अटकसांगलीच्या मिरज तालुक्यातील पद्मावती मंदिरातील चोरीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे.चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करत त्याच्याकडून साडे नऊ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. अक्षय मोरे,असे या चोरट्याचं नाव असून दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातल्या आरग येथील पद्मावती मंदिरामध्ये चोरी करत देवीच्या अंगावरील दागिने लंपास केले होते.
मुलाच्या निधनानंतर ९ तासात जन्मदेत्या आईने सोडले प्राण४७ वर्षीय मुलाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. घटनेची माहिती आईला मिळताच आईनेही नऊ तासात प्राण सोडले. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका या गावात घडली. अवघ्या नऊ तासाच्या अंतराने मायलेकांचा मृत्यू झाल्याची घटना गावात पसरतात गावामध्ये शोककळा पसरली. पांडुरंग नामदेव गवळी वय ४७, निर्मलाबाई नामदेव गवळी वय ७० वर्ष रा. ता. सोयगाव तिडका असे मृत मायलेकांचे नाव आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा संबंध असेल तर त्याला सोडणार नाही; मंत्री भरत गोगावलेसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलीस आणि सीआयडी यांच्याकडून सुरू असून वस्तुस्थिती समोर येईलच. त्यात जर वाल्मीक कराडचा संबंध असेल, तर त्यालाही त्यात घेतलं जाईल, त्याला सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना पत्रकारांशी बोलताना भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्याचा मुलगा आमदाराचा नामदार झाला, आता पालकमंत्रीही व्हावा ही सगळ्यांची इच्छा!सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला, आमदाराचा नामदार झाला, आता पालकमंत्रीही व्हावा, अशी सगळ्यांचीच इच्छा असून जे ईश्वराला प्रिय आहे ते होईल. चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून दिली आहे. पालकमंत्री ठरत नसल्यामुळे कोणतीही विकासकामं अडलेली नसून लोकांची कामं सुरूच आहेत. जानेवारी अखेरपर्यंत पालकमंत्री पदांचं वाटप होईल, असंही गोगावले म्हणाले. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधताना भोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली.
mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याला सुरूवातप्रयागराज - सकाळी ९ वाजेपर्यंत ६० लाख नागरिकांनी केले स्नान
कुंभ मेळ्याला आज पासून सुरुवात
सकाळी ५ वाजून ३ मिंट हा आजच्या पवित्र स्नानाचा मुहूर्त होता
कुंभ मेळ्यात एकूण ६ स्नान असणार यापैकी पाहिले स्नान आज
लाखो भाविक प्रयाग राज मध्ये दाखल
मंत्री गिरीश महाजनअतिशय दुर्दैवी अपघात आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे.- भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करून लवकरच पोलीस आणि आरटीओ विभागाची बैठक घेणार आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईच्या सूचना देऊ. अनेकदा ट्रक, ट्रेलरना मागे टेल लॅम्प नसतात, हे अतिशय गंभीर आहे. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवला कापूसमागील वर्षी भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. यानंतर यंदा देखील शेतकऱ्यांवर तीच वेळ आली असून कापसाला यंदा अपेक्षेपेक्षा कमी भाव असल्याने नांदेड जिल्ह्यातील 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात हजारो हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र जुन जुलै माहिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. तसेच कापूस फुटताना देखील अवकाळी पावसाने नुकसान झाले. शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कापसावर असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. गेल्या वर्षी कापसाला 8 हजार 800 ते 9 हजार 200 रुपये क्विंटल भाव मिळाला होता. मात्र या वर्षी पावसाने भिजलेल्या कापसाला व्यापाऱ्यांकडून 7 हजार ते 7 हजार 200 रुपये इतकाच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापुस घरात साठवून ठेवला आहे.
Thane News : घोडबंदर रोडवर अपघात, एकाचा मृत्यूठाण्यातील घोडबंदर रोड वरील विजयनगरी सिग्नल जवळ पहाटे 2 वाजून 45 च्या सुमारास ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली.
या धडकेत एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास कासारवडवली पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.
आज मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख करणार मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई केली जावी, तसेच ३०२ च्या गुन्ह्यात आरोपी करावं.. या मागणीसाठी मस्साजोग येथे धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा, अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे..
Pune News : शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेत गारवागेल्या ४८ तासांत बदलत्या हवामानामुळे किमान व कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवेली तालुक्यात एक ते दोन अंशांनी वाढ
किमान तापमान १३.६ तर शिवाजीनगर परिसरातील किमान तापमानत १५.५ अंशांवर पोहचले.
शहरासह जिल्ह्यात सततच्या हवमान बदलामुळे कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती झालेली आहे.
मागील आठ दिवसांत किमान तापमानही एक ते दोन वेळाच ९ अंशापर्यंत खाली आले.
त्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी पडलीच नाही. त्यातही एनडी, पाषाण, औंध, वारजे, कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरातच काहीसा थंडीचा जोर असून, अन्य परिसरात थंडी गायब आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत किमान तापमानात एक ते दोन तर काही भागांत तीन अंशांनी घट झाली आहे.
त्यामुळे १० अंशांवर असलेले किमान तापमान १३ अंशांवर, तर जास्तीत जास्त २० अंशांवर किमान तापमान पोहचले.
मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे काही भागात गारवा जाणवत होता.
पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे, आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे
महिनाभरात झालेल्या तपासाची देशमुख कुटुंबाला कसलीही माहिती नाही - धनंजय देशमुखसंतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे तरी देखील अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी देशमुख कुटुंब आंदोलन करणार आहे या प्रकरणाचा तपास केला जातो परंतु आम्हाला अद्यापही एकदाही याबाबत माहिती दिली नाही नेमका तपास कसा होतो याबद्दलच आम्हाला प्रश्न निर्माण झाले असून यावर सीआयडी चे अधिकारी कोणतीही माहिती देत नसल्याने आता आम्ही आंदोलन करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे.
मिरजेत पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या चोरट्याचा सिनेस्टाईल पाठलागपुणे पिंपरी चिंचवड येथील बजाज चेतक साई सर्व्हिस प्रा.लि. चिंचवड या इलेक्ट्रीक दुचाकी शोरुम मध्ये पीडीआय टेक्निशियन म्हणून काम करणारा आकाश गौतम कांबळे, राहणार मिरज तालुक्यातील शिंदेवाडी याने शोरुममधील 5 लाख रुपये रोख रक्कम चोरी करून फरार झाला होता.. त्याला मिरज शहर पोलिसांना जेरबंद केले आहे. पण मिरज शहर ठाण्यामध्ये त्याला आणले असता तिथूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. या चोरट्याचा पोलीस पाठलाग करून पकडल्याचे सी सी टिव्ही मध्ये कैद झाले आहे.
Santosh deshmukh : देशमुख कुटुंबियांच्या संयमाचा बांध फुटला - दानवेसंतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचे स्पष्ट आहे . या सर्व घटनेचा कर्ता धर्ता वाल्मीक कराडच आहे. असं असताना वाल्मीक कराड याला मोका का लावला जात नाही असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला केलाय. वाल्मीक कराडला मोका लावत नसतील तर देशमुख कुटुंबीयांचा संयमाचा बांध फुटणे साहजिक आहे. अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. वाल्मीक कराड याला मोका लावला नाहीतर आपण स्वतःला संपवू असा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सरकारला दिलाय. त्यावर ते बोलत होते.
नळदुर्ग( मैलारपुर) येथील खंडोबा याञेला प्रारंभ - मोठ्या प्रमाणावर भाविक दाखलमहाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक व तेलंगनातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या नळदुर्ग मैलारपुर येथील श्री खंडोबा याञेला रवीवार पासुन प्रारंभ झालाय दरम्यान धाराशिव सोलापूर व लातुर जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर काठ्या दाखल होत आहेत.दरम्यान याञेसाठी मंदीरावर आकर्षण अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन फुलांच्या माळांनी सजवण्यात आले आहे.याञेचा आजचा मुख्य दिवस असुन लाखो भाविक आज दाखल होण्याची शक्यता आहे तर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजराने मंदीर परीसर दणाणला आहे.पुजा,नवस,दंडवत भंडारा उधळणीसह धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान या याञेसाठी प्रशासनाने व मंदीर समीतीने जय्यत तयारी केली आहे.
एपीएमसी बाजारात मक्याचे दर घसरल्याने व्यापारी चिंतेतनवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या मक्याचे दर घसरल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेय. बाजारात मक्याची आवक चांगली होगा असून मालाला उठाव नसल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे चित्र पहायला मिळतंय. सध्या बाजारात मक्याच्या कणसाची एक गोणी 400 रुपयांना विकली जात असून आठवड्याभरातच यामध्ये 100 रुपयांची घसरण झालेय. पुढील काही दिवस दर कमीच राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केलेय.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिवस१४ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दीन आहे. नामविस्तार दिनानिमित्त उद्या १४ जानेवारी रोजी विविध पक्ष,संघटनांतर्फे अभिवादन फेरी काढून विद्यापीठ गेटसमोर जाहीर सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे.मकई गेट ते विद्यापीठ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.रविवारी पहाटे सहा ते रात्री बारापर्यंत हा बदल लागू असेल.मात्र हे नियम पोलिस अधिकारी,अग्निशमन दल,रुग्णवाहिका,आरोग्यसेवा, दंडाधिकारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी लागू नाही. नामविस्तारदिनी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस कर्मचारी असणार आहेत.नामविस्तारदिनी शहरभर कार्यक्रम आहेत.त्यामुळे शहरासह विद्यापीठ परिसरात १ हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
Maharashtra Live Update : तर वैभव नाईक यांच्या घराला टाळे ठोकणार - नारायण राणे यांचा वैभव नाईक यांना सज्जड इशाराचिपी विमानतळाला टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळे ठोकतो असा सज्जड दम खासदार नारायण राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिला आहे. चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारी विमान वाहतूक येत्या पंधरा दिवसात सुरू न झाल्यास चिपी विमानतळाला टाळे ठोकणार अशा पद्धतीचा इशारा वैभव नाईक यांनी प्रशासनाला दिला होता. वैभव नाईक यांच्या या इशाऱ्याचा नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी वैभव नाईक यांच्यावर एकेरी टीका करताना टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळ ठोकलं नाही तर नारायण राणे नाव सांगणार नाही असा दम सुद्धा भरलाय.
Solapur : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराचा 'अक्षता सोहळा'सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा 'अक्षता सोहळा' आज पार पडणार आहे.हिरेहब्बू वाड्यापासून वाजतगाजत मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक सिद्धरामेश्वर मांडोरापर्यंत निघते.मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडा सोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा यावेळी पार पडतो.या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक सामील होतात.
Maharashtra Live Update : पन्हाळा पोलिसांनी बकरी चोरणारी टोळी केली गजाआडपन्हाळा पोलिसांनी बकरी चोरणाऱ्या टोळीला गजाआड केले. या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीसीटीव्ही वरून या चोरट्यांचा छडा लावल्या असल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली आहे.
नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवरील कारवाईला वेग- ५ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- आत्तापर्यंत ७४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना पोलिसांनी केलं तडीपार
- रविवारी नाशिक पोलिसांनी ३ ठिकाणी छापे टाकत १ लाखांचा नायलॉन मांजा केला जप्त
- नायलॉन मांजा विक्रेत्यांसह आता नायलॉन मांजा वापरणारे देखील रडारवर
- इमारतींच्या टेरेसवर जाऊन तपासणीचे पोलिसांना आदेश
- जीवघेणा नायलॉन मांजामुळे मागील काही दिवसात नाशिकमध्ये १९ घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मिरवणुकीला होणार सुरुवातअवघ्या कांही वेळात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मिरवणुकीला होणार सुरुवात
हिरेहब्बू वाडा ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत निघणार भव्य दिव्य मिरवणूक
सात मानाच्या नंदी ध्वजासह सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखी आणि योगदंडासह निघणार मिरवणूक
आज सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्राथिनिधिक स्वरूपात पार पडणार विवाह सोहळा
संमती कट्ट्यावरती लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार अक्षता सोहळा
भंडाऱ्यात गोबरवाही पोलीसांकडून 3 अवैध रेती टिप्परवर कारवाईपोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना मागील काही दिवसा पासुन गोबरवाही पोस्टे. हद्दीतील बावनथडी नदी पात्रातुन रेती चोरी होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या सदर रेती चोरी मध्यप्रदेश भागातील माफीया चोरुन घेवुन जावुन त्यांच्या भागात साठा करुन ती पुन्हा बेकायदेशीर मार्गाने विक्री करीत असे. काल रात्री मध्यप्रदेशातुन काही अवैध वाहतुक करणारे टिप्पर गोबरवाही पो.स्टे. हद्दीतून जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहीती पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांना भेटल्याने त्यांचे आदेशान्वये गोबरवाही पोलिसांनी पाळत ठेवली असता 03 टिप्पर लेंडेझरी ते रोंगा रोडवर मिळून आल्याने टिप्पर क्र. 1) एमएच 31/ एफसी 8360, 2) एमएच 40/ सीटी 2357, 3) एमएच 40/सीटी 6221 व त्यांचे चालक नामे 1) सागर रमेश मेश्राम, वय 24 वर्ष, रा. कन्हान ता. कन्हान 2) शिवकुमार बाळकृष्ण कोडापे, वय 37 वर्ष, रा. नरखेड जि. नागपुर 3) उमेश जयसिंग चौरे, वय 47 वर्ष, रा. खापरखेडा जि. नागपुर यांना ताब्यातुन एकुण किमती 1,06,20,000/- रु चा माल मिळुन आल्याने त्यांचेवर अप क्र. 11/2025 कलम 303 (2), 3(5) भा.न्या.सं. सहकलम 48(8) महा. जमिन महसुल अधिनीयम सहकलम 7.9 पर्यावरण सरंक्षण अधिनीयम अन्वये कार्यवाही केली.
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्हराज्यात महायुतीची सत्ता आली.मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही.मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.आता छगन भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ऍक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. मराठवाड्यात गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक ही मोहीम समता परिषदेकडून राबविण्यात येत आहे. धाराशिव इथ समता परिषदेची आढावा बैठक पार पडली या बैठकीत परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी पुढील रणनीती पदाधिकाऱ्यांना सांगितली.धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 100 शाखांचे उद्घाटन करण्याचं यावेळी ठरवण्यात आले.
Beed News : बीडमधील खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडचा पोलिस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे उद्या कळणार आहे. वाल्मीक कराडला उद्या मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार, की लांबणार हे ठरणार आहे. सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल. २९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. पुणे महानगरपालिका देणारा ११ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमहापालिकेच्या वतीने 2024 मध्ये दहावी मधील विद्यार्थ्यांना मौलाना अब्दुल कलाम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अर्थसाह्य योजनेअंतर्गत देणार शिष्यवृत्ती
13638 अर्जुन पैकी 11000 विद्यार्थ्यांचे अर्ज ठरले पात्र
संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होणार
मागील अनेक वर्षांपासून महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे राबवण्यात येते योजना
दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पंधरा हजार रुपये तर बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये अर्थसहाय्य
नायलॉन मांजा वापरला तर थेट गुन्हाछत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगासाठी नायलॉन मांजा वापरला तर थेट गुन्हा केला जाणार असल्याचा इशारा संभाजीनगर शहर पोलिसांनी दिलाय. महिनाभरात छत्रपती संभाजीनगर शहरात २५ जणांना दुखापती झाल्या आहेत. मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये,म्हणून पोलिसांनी शहरात ध्वनिक्षे कांद्वारे जनजागृती सुरू केली आहे.त्याचबरोबर नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगणारे बॅनरही लावण्यात आले आहेत.नायलॉन मांजामुळे सुमारे २० जण जखमी झाले आहेत.या पाश्र्वभूमीवर शहरात पोलिस नायलॉन मांजाविरुद्ध जनजागृती मोहीम राबवत आहेत.नायलॉन मांजा वापरणारे आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.आतापर्यंत ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.त्यापैकी ६ जणांवर कलम ११० अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.नायलॉन मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी दिला होता.आता पोलिसांनी जनजागृती सुरुवात केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरणयवतमाळ जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बीतील गुह आणि हरभरा धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असली तरी दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहेत.त्यामुळे गुह आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत.
पुण्याला २०० इलेक्ट्रिक बस मिळणारमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत (एसटी) पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात २०० इलेक्ट्रिक बस येणार
पूर्वीपेक्षा जास्त बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचा निर्णय
प्रस्तावित स्वारगेट, दापोडी ‘चार्जिंग स्टेशग्स’वर एकाच वेळी ३६ बस चार्ज होणार
महामंडळातील जुन्या बस मोडीत काढून इलेक्ट्रिक बस वाढविण्यावर भर
सध्या पुणे विभागात ६६ इलेक्ट्रिक बस आहेत
स्वारगेट आणि दापोडी येथे ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्यासाठी आवश्यक परवानग्यादेखील पूर्ण
जळगावमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाजळगाव नवीन वर्षात जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. हा दर २०२३ ला ९२५ होता, तो आता ९३० झाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून, २०२३ च्या मानाने २०२४ मध्ये मुलींच्या जन्मदरात काही अंशी वाढ झाली आहे.
Santosh Deshmukh case: मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख करणार मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई केली जावी, तसेच ३०२ च्या गुन्ह्यात आरोपी करावं.. या मागणीसाठी मस्साजोग येथे धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा, अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे..
Pune News :येत्या काळात पुणे ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येणार असून उद्याोजक, कंपन्या पुण्यात आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘सेमीकंडक्टर मिशन’ अंतर्गत रांजणगाव येथे प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक उत्पादन संकुलाचे (मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली.
स्टोरियन एचके’ आणि ‘आयएफबी’ या दोन मोठ्या कंपन्यांकडून या संकुलाची उभारणी सुरू असून येत्या काळात ५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात येईल. सेमीकंडक्टरशी निगडित विविध प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. शिवाय देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढेल असं ही ते म्हणाले.
Pune : विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेला ३८ लाख रुपयांना गंडापीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने महिलेला उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केली. यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. पिडीत महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
आपल्याला जमीन खरेदीसाठी पैसे लागणार असल्याचे सांगत त्याने तिच्याकडून तब्बल ३८ लाख रुपये उकळले. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली
गावरान टोमॅटोच्या लागवडी मधून शेतकरी घेतोय लाखो रुपयांचे उत्पादनमावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाला ची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. शेतातील भात काढून झाल्यावर अनेक शेतकरी आता भाजी लागवड करू लागले आहेत. मावळच्या कासारसाई मधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ एक एकर क्षेत्रात साहो जातीच्या गावरान टोमॅटो ची लागवड केली. मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे.
रामोशी बेडर समाजाचे वार्षिक अधिवेशन...सांगोला येथे राज्यातील रामोशी बेडर समाजाला संघटीत करण्यासाठी स्थापन केलेल्या जय मल्हार संघटनेचे वार्षिक अधिवेशन राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या उपस्थितीत पार पडले. अधिवेशनात आगामी काळात रामोशी,बेडर यासह बारा बलुतेदारांना एकात्रित करून त्यांना राजकीय समाजिक न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाला स्थान मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे.
सांगोल्यात संमीश्र पालेभाजी शेतीचा प्रयोग यशस्वीदुष्काळी सांगोला तालुक्यातील अकोला गावातील दिनेश खटकाळे या तरूण शेतकर्याने संमिश्र पालेभाज्या आणि फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. संमिश्र पिक लागवड शेती त्यांना फायद्याची ठरली आहे.
तीन एकर शेतीवर त्यांनी 35 प्रकारच्या विविध पालेभाज्या आणि 40 प्रकारच्या विविध फळ झाडांची लागवड केली आहे. याबरोबरच त्यांनी फळ बागेत अंतर्गत पिक म्हणून मसाल्याची लागवड केली आहे.
सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या पालेभाज्यांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे शेतीतून मिळणार्या वार्षिक उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे.
Maharashtra Live Update : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज रायगड दौऱ्यावरविधानसभेतील विरोधी पक्षनेते रायगड जिल्हयाच्या दौरयावर आहेत. सकाळी ते किल्ले रायगडाला भेट देवून छत्रपती शिवरायाना अभिवादन करतील. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे जे काम प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे.त्याची अधिकारयांकडून माहिती घेतील. पाचाड इथं जिजाऊ समाधी दर्शन, चवदार तळयाला भेट दिल्यानंतर ते दरडग्रस्त तळीये गावाला भेट देणार आहेत. ते सुरू असलेल्या पुनर्वसनाच्या कामाची ते पाहणी करतील या विषयावर ते ग्रामस्थ आणि अधिकारयांशी चर्चा करणार आहेत.
बंधा-याचे 44 लाख रुपये पाण्यातगावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रवली गावात वर्षभरापूर्वी सतीचा प-या याठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला.मात्र या बंधा-यात पाणीच साचत नसल्यानं गावावर पाणी भिषण टंचाईची टांगती तलवार उद्भवणार आहे.कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधा-यात पाण्याची साठवणूक होत नाही.याच पाण्यावर भाजीपाला करणा-या शेतक-यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळेत नाही त्यामुळे बंधा-यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेलेत.
Crime : भुसावळ खूनप्रकरणी पाच जणांना अटक गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस हस्तगतजळगाव दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे झालेल्या तेहरीम अहमद नासीर अहमद भुसावळ या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, इतर दोनजण ताब्यात असून, त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
भुसावळ येथे १० जानेवारी रोजी या तरुणाचा खून करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून कट रचून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कटात सहभागी संशयित यांना पोलिसांनी बल्लारशाह येथून अटक केली