Santosh Deshmukh Case : माझ्या भावाला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, धनंजय देशमुख यांचा निर्धार
Marathi January 13, 2025 07:24 PM

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी देशमुख यांनी केली. हे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. माझ्या भावाला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा निर्धार धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.

धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्यासोबत लढणाऱ्यांवर केसेस होत असतील मी लढणार नाही. लोकसेवा करत असताना माझ्या भावाचा खून झाला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एवढा त्रास दिला गेला. आम्ही न्याय मागतोय तर आम्हाला आंदोलन करावं लागतं, हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे देशमुख म्हणाले.

तसेच माझ्या भावाचा खून झाला आहे, आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर प्रत्येक कार्यालयात आम्ही फिरायला पाहिजे का? माझ्या भावाला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन. मुख्यमंत्र्याना मी सांगतो की माझा सरकारवर पुर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका. सर्व अरोपींवर मकोका लावून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मी सरकारकडे गेली आहे असेही देशमुख म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.