धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुखांना फोन करून संवाद साधला. तुम्ही पाण्याच्या टाकीवरून खाली या, आम्ही सरकारचं जगणं मुश्किल करू असं विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
Laxman Hake : लक्ष्मण हाके यांना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी धमकीलक्ष्मण हाके यांना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी जरांगे यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आला आहे. पत्रकार परिषदापूर्वी फोनहून अरेरावी करण्यात आली आहे.
Beed Live : मस्साजोगमध्ये आंदोलनापूर्वी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनसंतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आज मस्साजोगमध्ये मोबाईल टाॅवरवर चढून आंदोलन करणार होते. पोलिसांनी मोबाईल टॉवरजवळ बंदोबस्त वाढविला होता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे.
Anandraj Ambedkar : आनंदराज आंबेडकर यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेटआनंदराज आंबेडकर यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी करण्यात येणाऱ्या तपासा विषयी विचारपूस केली. आम्ही आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहोत असा शब्द आनंदराज आंबेडकरांनी यावेळी दिला.
Narendra Modi At Maharashtra :पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या 237 आमदारांची शाळा; मुंबईत साधणार संवाद!येत्या पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत आहेत. महायुतीच्या 237 आमदारांची बैठक त्यांनी बोलावली आहे. त्यात ते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्यांदाच ते एखाद्या राज्यातील आमदारांशी थेट संवाद साधणार आहेत. तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत. मोदी महायुतीच्या आमदारांशी कशी याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Nashik Accident : नाशिकमध्ये लोखंडी सळईने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक, 8 जणांचा मृत्यू,मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर रविवारी संध्याकाळी साडेसात- आठच्या सुमारास पुढे चाललेल्या सळईच्या ट्रकमध्ये मागून भरधाव आलेला टेम्पो थेट घुसला. पुढच्या ट्रकमधील बाहेर असलेल्या सळई घुसून पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. धुळ्याकडून नाशिकमध्ये उतरणाऱ्या रॅम्पच्या पुढे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी पाथर्डी फाटा, सह्याद्रीनगर (सिडको) येथील आहेत.
Manoj jarange Patil : जरांगे पाटील आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणारआज 11 वाजता मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
UBT MP Sanjay Raut Live Update : इंडिया आघाडी मजबूत असली पाहिजे : खासदार संजय राऊतइंडिया आघाडी लोकसभेसाठी स्थापन झाल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी, ओमर अब्दुल्ला यांच्या मताशी आपण सहमत नसून इंडिया निश्चितच एक मजबूत आघाडी आहे. लोकसभेसाठी ती उभारण्यात आली आणि आम्ही चांगले लढलो. परंतु त्यानंतर इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झाली नाही, हे दुर्दैवी आहे. काँग्रेस आघाडीतील मोठा पक्ष असल्याने ती जबाबदारी काँग्रेसची आहे. येत्या काळात जर आपल्याला युती वाचवायची असेल किंवा ती अधिक मजबूत करायची असेल तर सर्वप्रथम संवाद आवश्यक असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.
Kumbhamela Live Update : महाकुंभमेळ्याला सुरूवात; 60 लाख नागरिकांनी केले पवित्र स्नानप्रयागराज येथे कुंभ मेळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 60 लाख नागरिकांनी पवित्र स्नान केले असून सकाळी 5 वाजून 03 वाजेचा पवित्र स्नानाचा मुहूर्त होता. या कुंभ मेळ्यात एकूण 6 स्नान असणार असून यापैकी पाहिले स्नान आज झाले.
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला, आमदाराचा नामदार झाला, रायगडचा पालकमंत्रीही व्हावा, अशी रायगडकरांची इच्छा आहे. पण जे ईश्वराला प्रिय आहे तेच होईल. काही चांगलं घडायचं असेल तर जरा वेळ लागतो असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे. गोगावले यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. ते अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
DCM Eknath Shinde Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा 'दरे' या मूळगावी रवानाशिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळ गावी गेले आहेत. तिथं ते आपल्या मूळ गावासह पुनावळे भागातील पर्यटन प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. सकाळी 11 वाजल्यानंतर या आढाव्याला सुरवात होईल.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 हजार मिळवून देणार; आमदार रवी राणाआमदार होऊन आता कंटाळलोय, आता मला मंत्री व्हावं वाटतंय, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. मंत्री कसा काम करतो हे दाखवून देण्यासाठी एकदा तरी मंत्री बनायचंय, अशी इच्छा रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी लाडक्या बहिणींना आता 1500 मिळत आहेत. 2100 मिळतील पण आपण 3000 मिळवून देवून असे वक्तव्यही आमदार रवी राणा यांनी केलं आहे.
Beed Sarpanch Murder Case : आरोपी विष्णू चाटेला आज कोर्टात हजर करणारदेशमुख हत्या आणि खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र सीआयडीने तपासासाठी आपल्या ताब्यात देण्याची मागणी न्यायालयात केल्यामुळे केज न्यायालयाने दोन दिवसांसाठी त्याला सीआयडी कोठडी सुनावली होती. आज ही सीआयडी कोठडी संपत असल्यामुळे विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार आहे.
Vishalgad issue : विशाळगडावर पोलीस बंदोबस्तात वाढउरुसाच्या पहिल्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यात भेट देत दर्शन घेतल्यानंतर आता पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी विशाळगडावर उरुसाच्या पार्श्वभूमीवर फौजफाटा तैनात केला आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली आहे.
PM Modi : महाकुंभ मेळाव्याला PM मोदींनी दिल्या शुभेच्छामहाकुंभ मेळाव्याला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी, भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी महाकुंभ मेळाव्यावा अतिशय खास दिवस आहे. महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू होत आहे, जो असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक असल्याचे PM मोदींनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबल यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. त्यांनी या योजनेत नियमांत न बसणाऱ्या महिलांनी आपले अर्ज स्वतःहून मागे घ्यावेत. अन्यथा दंडासह पैसे वसूल करा असे म्हटले आहे.
Sujat Ambedkar : दोन जातींमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय : सुजात आंबेडकर‘स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. रविवारी (ता.१२) किल्ले विशाळगडला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नानप्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे आजपासून महाकुंभ मेळ्यास सुरुवात होत असून पहिल्या पर्वणी आहे. यानिमित्ताने त्रिवेणी संगमात मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नान करत आहेत.
संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आता सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. दरम्यान 11 वाजता मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मस्साजोग जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mahakumbh Mela 2025 live: प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावात दगडफेकप्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे आजपासून महाकुंभ मेळाव्याची सुरुवात झाली आहे. देशभरातून लाखों भाविक हे प्रयागराजला जात आहे. अशातच जळगाव परिसरात ही घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरतहून प्रयागराजला जाणाऱ्य ताप्तीगंगा एक्सप्रेसवर जळगाव येथे अज्ञातांनी दगडफेक केल्याचे समजते. यात रेल्वेच्या काही डब्याच्या काचा फुटल्या आहेत.
Santosh Deshmukh Murder Investigation: वाल्मिक कराडवर 'मोक्का' लावामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आठ आरोपींना शनिवारी मोक्का लावला आहे. पण खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमक्यांचे सत्र सुरु झाले आहे. धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात आंदोलन पुकारण्याची भूमिका घेतली आहे.आज धनंजय देशमुख हे मोबाईलवर चढून आंदोलन करणार आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी टॉवरवरुन चढून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोगाच्या ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे आजपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याची पहिली पर्वणी आज (१३ जानेवारी २०२५) असून शेवटची पर्वणी दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी असणार आहे. हा महाकुंभमेळा 45 दिवसांचा आहे.या महा कुंभामध्ये देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत. येथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम होतो. ४५ दिवस चालणारा हा कुंभमेळा केवळ आर्थिक, प्रशासकीय दृष्ट्याच महत्त्वपूर्ण नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपराही जगासमोर आणतो.